Ahmednagar Corona Update | महिनाभरात 83 लाखांचा दंड वसूल, अहमदनगरमध्ये 66 हजार नागरिकांवर कारवाई

अहमदनगरातही कोरोनाच्या संख्येत वाढ झाली आहे (Ahmednagar Corona Update).

Ahmednagar Corona Update | महिनाभरात 83 लाखांचा दंड वसूल, अहमदनगरमध्ये 66 हजार नागरिकांवर कारवाई
Ahmednagar Mask Action
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 9:41 AM

अहमदनगर : राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अहमदनगरातही कोरोनाच्या संख्येत वाढ झाली आहे (Ahmednagar Corona Update). आज 327 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, एका दिवसात 509 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढत चालल्याने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी रस्त्यावर उतरुन कारवाई केली (Ahmednagar Corona Update Action Took Against People Who Are Without Mask And Violating Rules).

यावेळी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून यात सरकारी कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पाहून अनेकांची धावपळ उडाली.

महिनाभरात 83 लाखांचा दंड वसूल

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून महिनाभरात 83 लाख दंड वसूल करुन 66 हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आलीये. तर 15 दिवसात 16 हजार लोकांवर कारवाई करण्यात आली. तर 28 लाख दंड आकारण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी म्हटलं.

जिल्हाधिकाऱ्यांचं नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे अहवान

तसेच, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे अहवान केले. तसेच मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा गेल्यावर ती सारखी परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा त्यांनी दिलाय.

‘लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त गर्दी करु नये’

ज्या दुकानात मास्क वापरले जाणार नाहीत, ते दुकान महिनाभर सील करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच, लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त गर्दी करु नये. त्यासाठी पोलिसांची नेमणूक मंगल कार्यालयात गर्दी आढळल्यास मंगल कार्यालय बंद केले जातील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय (Ahmednagar Corona Update Action Took Against People Who Are Without Mask And Violating Rules).

राज्यातील कोरोनाची स्थिती

राज्यात 15,817 नवीन रुग्णांचे निदान झालेय. तर राज्यात आज 56 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झालीय. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 22,82,191 झाली. राज्यात 11,344 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर राज्यात आजपर्यंत एकूण 21,17,744 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.79% एवढे झालेय. आज राज्यात 15,817 नवीन रुग्णांचे निदान झालेय. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.31 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,73,10,586 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 22,82,191 (13.18 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,42,693 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर 4,884 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 1,10,485 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Ahmednagar Corona Update Action Took Against People Who Are Without Mask And Violating Rules

संबंधित बातम्या :

मीरा भाईंदरमध्ये कोरोना संसर्ग वाढला; चिंता वाढल्यामुळे हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये लॉकडाऊन, जाणून घ्या नवे नियम

नालासोपारा लसीकरण केंद्रात लसीकरणाच्या रांगेत चक्कर, पुढच्या क्षणातचं सर्व संपलं

Panvel Lockdown latest news: पनवेलमध्ये रात्रीची संचारबंदी, काय सुरु? काय बंद? वाचा सविस्तर

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.