अहमदनगर जिल्हा रुग्णालयात 11 पैकी 6 जणांचा गुदमरुन मृत्यू, तर चौघे होरपळले; शवविच्छेदन अहवाल पूर्ण

सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन अहवाल पूर्ण झाले. त्यावेळी 11 पैकी 6 जणांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. तर 4 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. एका मृतदेहाता व्हिसेरा राखून ठेवण्यात आलंय. तर एका अनोखळी मृतदेहाचे डीएनए ओळख पटवण्यासाठी राखून ठेवण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात 11 पैकी 6 जणांचा गुदमरुन मृत्यू, तर चौघे होरपळले; शवविच्छेदन अहवाल पूर्ण
नगरच्या सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग कशामुळे?
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 4:37 PM

अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत एकूण 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली. त्यानंतर आज या सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन अहवाल पूर्ण झाले. त्यावेळी 11 पैकी 6 जणांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. तर 4 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. एका मृतदेहाता व्हिसेरा राखून ठेवण्यात आलंय. तर एका अनोखळी मृतदेहाचे डीएनए ओळख पटवण्यासाठी राखून ठेवण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Ahmednagar District Hospital fire, 6 people suffocated and 4 people died in the fire)

अग्नितांडव प्रकरणात गुन्हा दाखल

जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग लागल्यानंतर आग विझवणे, रुग्णांना तात्काळ सुरक्षीत ठिकाणी हलविणे, रुग्णांचे जीव वाचवणे या सर्वांबाबत हलगर्दीपणा करणे, तसंच इतर अनुषंगिक कारणांमुळे 11 जणांचे मृत्यू आणि रुग्णांच्या दुखापतीस जबाबदार असलेल्या संबंधितांविरोधात भांदवी कलम 304 (अ) नुसार फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

आगीमागील धक्कादायक वास्तव समोर

दरम्यान, जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी विशेष वॉर्ड करण्यात आला होता. रुग्णांची संख्या वाढल्यानंतर त्याचं अतिदक्षता विभागात रुपांतर करण्यात आलं. मात्र, ते करत असताना अग्निसुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केल्याचं आढळून आलंय. कोरोना काळात अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यातं आलं होतं. त्यात नगरच्या जिल्हा रुग्णालयाचाही समावेश होता. महापालिकेच्या अग्निशमन दलाने दिलेल्या अहवालात काही त्रुटी दाखवण्यात आल्या होत्या. त्यात फायर अलार्म, स्पिंकलर, पाण्याचे पंप अशी यंत्रणा नसल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं होतं. त्याची तातडीने पूर्तता करण्याची सूचनाही करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याची धक्कादायक बाब आता समोर आलीय.

मृतांच्या कुटुबीयांना 5 लाखाची मदत

दरम्यान, या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तर आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखाच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलीय. तर दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घेतली. या दुर्घटनेत 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून 7 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेची माहिती मी तातडीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिली. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत असून या दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल आणि त्याचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश दिल्याची माहिती टोपे यांनी दिलीय.

इतर बातम्या :

‘राष्ट्रवादीने आता पवारसाहेबांवर जास्त हक्क सांगू नये’! बाळासाहेब थोरातांची कोटी, उपस्थितांमध्ये खमंग चर्चा

‘नगर जिल्ह्यात लग्न झाल्यावर पाण्यावर भाषणं व्हायची!’ शरद पवारांनी सांगितला किस्सा, बदलत्या परिस्थितीचंही कौतुक

Ahmednagar District Hospital fire, 6 people suffocated and 4 people died in the fire

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.