Video: हळदीच्या कार्यक्रमात नाचवल्या नंग्या तलवारी, आता नाचणारे थेट पोलिसात

हळदीच्या कार्यक्रमात तलवारी कुठून आल्या, आणि त्या कशा आल्या याची चौकशी पोलीस करत आहेत. दहा पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करुन यापैकी कोणाच्या या तलावारी आहेत त्याचीही चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Video: हळदीच्या कार्यक्रमात नाचवल्या नंग्या तलवारी, आता नाचणारे थेट पोलिसात
अहमदनगरमध्ये हळदीच्या कार्यक्रमात नंग्या तलवारी नाचवल्या
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 8:54 PM

अहमदनगर: लग्नाआधी होणाऱ्या हळदीच्या (Marriage Programme) कार्यक्रमात अहमदनगरमध्ये (Ahmednagar) नंग्या तलावारी (Sword) नाचवत नाचगाणी दहा पंधरा जण गाण्यावर बेधुंद होऊन नाचत होते. या प्रकरणी लग्न असणाऱ्या विवाहच्छूकाच्या वडिलांसह दहा पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल (Filed crime) केला गेला आहे. नंग्या तलवारी नाचवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे तलवारी घेऊन नाचणाऱ्याविरोधात आणि नाचणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.

सोशल मीडियावर तलवारी नाचवतानाचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यानंतर तात्काळ संबंधित संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.

तलवारी आल्या कुठून

हळदीच्या कार्यक्रमात तलवारी कुठून आल्या, आणि त्या कशा आल्या याची चौकशी पोलीस करत आहेत. दहा पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करुन यापैकी कोणाच्या या तलावारी आहेत त्याचीही चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कोणतीही परवानगी नाही

याप्रकरणी सांगण्यात आले आहे की, या कार्यक्रमाविषयी कोणतीही परवानगी काढण्यात आली नव्हती. ध्वनिक्षेपक लावणे, मिरवणूक काढणे याबाबतीत कोणतीही परवानगी न काढताच लोकं जमवून त्यांच्यामध्ये नंग्या तलवारी नाचवताना दोघे तरुण दिसत आहेत. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नवरदेवाच्या वडिलांविरोधात गुन्हा

हळदीच्या कार्यक्रमात नंग्या तलवारी नाचवल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात कलम 143,144,149 तसेच भारतीय हत्यार कायदा 4-25 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून निसार जागीरदार, फैजान जागीरदार, यांच्यासह 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आता या प्रकरणी पुढील कारवाई अहमदनगर पोलीस करत असून नंग्या तलावारी का नाचवण्यात आल्या आणि त्या आल्या कुठून याचा तपास करणार आहेत. मोठ मोठ्या तलवारी लोकांच्या घोळक्यात नाचवत असल्याने ही गोष्ट गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.