Ahmednagar : साईबाबांची काकड आरती शेजारती स्पीकरविनाच ; पोलिसांनी जाहीर केली स्पीकरची नवी नियमावली
दोन आरतीचा स्वर बंद झाला आहे. स्पीकरविना होणाऱ्या आरतीमुळे भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. आज पहाटे झालेल्या काकड आरतीवेळी आवाज येत नसल्याने भाविकांमध्ये कमालीचा संभ्रम पहायला मिळाला.
अहमदनगर – राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अल्टीमेटम नंतर पोलीस प्रशासनाने सर्वच धार्मिक स्थळांना नोटीस दिल्या आहेत. याचा फटका शिर्डीच्या साई मंदिराला (Shirdi Sai Temple) देखील बसला आहे. साईबाबांची पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी काकड आरती आणि रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी होणारी शेजारती आता स्पीकरविनाच (Speaker) होणार आहे. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत साईबाबा संस्थानला जिल्हा पोलिस प्रशासनाने स्पीकर लावण्याकरीता परवानगी दिली आहे. त्यामुळे दोन आरतीचा स्वर बंद झाला आहे. स्पीकरविना होणाऱ्या आरतीमुळे भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. आज पहाटे झालेल्या काकड आरतीवेळी आवाज येत नसल्याने भाविकांमध्ये कमालीचा संभ्रम पहायला मिळाला.
मनसे आणि मशिद ट्रस्टींची महत्वपुर्ण बैठक
राज ठाकरेंच्या भोंगा मुद्यावरुन पुण्याच्या ग्रामीण भागात हिंन्दु -मुस्लिम ऐक्यासाठी मनसे आणि मुस्लिम बांधवांची एकत्र बैठक झाली. मशिदीवरील भोंगे बंद ठेवण्याबाबत मनसे आणि मशिद ट्रस्टींची महत्वपुर्ण बैठक होती. खेड तालुक्यातील 14 मशिदीवर नियमांचे पालन करुन अजान पठन करण्याचे मुस्लिम बांधवांचे मनसेला वचन दिले आहे. मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्या समवेत मुस्लिम बांधवासह मशिद ट्रस्टींचे अध्यक्ष यांची बैठक पडली पार आहे.
292 मनसे कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई
पुण्यात मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसेने पुकारलेल्या आंदोलनप्रकरणात पोलिसांची बुधवारी दिवसभरात 292 मनसे कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई तर 58 जणांना ताब्यात घेऊन सोडून दिले.