अजितदादांच्या R R आबांबाबतच्या विधानावर काँग्रेस नेत्याचा निशाणा; म्हणाले, जनता बरोबर…

Balasaheb Thorat on Ajit Pawar Statement : अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांच्याबाबत एक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावरही या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर...

अजितदादांच्या R R आबांबाबतच्या विधानावर काँग्रेस नेत्याचा निशाणा; म्हणाले, जनता बरोबर...
बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते
Follow us
| Updated on: Oct 30, 2024 | 2:59 PM

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्याबाबत एक विधान केलं. आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांची उघड चौकशी व्हावी. या फाईलवर त्यांनी सही केली, असा आरोप अजित पवार यांनी केला. त्यांच्या या विधानावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किती वर्षांआधीची घटना आहे. आत्ताच कसं कळलं, इतके वर्षे कसे समजले नाही. तोपर्यंत यांनी पाहिलेलं नव्हतं असं कसं होईल. त्यांच्या पक्षातील लोक भाष्य करतील. एकत्र होते जिव्हाळ्याचे संबंध होते. इतक्या मोठ्या पदावर असतांना कसं नाही समजलं. जनता बरोबर न्याय देईल, असं बाळासाहेब थोरात म्हणालेत.

राज्यात महाविकास आघाडी सरकार येणार- थोरात

जनमानसात वातावरण महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. म्हणून आमच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. आम्ही चर्चा करून मार्ग काढू. महायुतीची संख्या जास्त, त्यांची मने खचली, प्रचंड वाद आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणालेत.

नाशिकची मंडळी सर्वांना ओळखते. आमचे 365 दिवस काम आहे. प्रत्येक कुटुंबाशी आम्ही निगडित आहोत. कोण उमेदवार येणार आम्ही विचार करत नाही. काही घुसले होते, वाकडे तिकडे भाषण करत होते. लोकांनी भाषण असे ऐकले नाही. आम्हाला वैचारिक भाषणाची सवय आहे. जनता निर्णय देणारी आहे. शिर्डी आणि संगमनेरची तुलना होऊन जाऊ द्या. 2 अडीच वर्षात घुसण्याचा प्रयत्न झाला, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

संगमनेरमधील लढतीवर काय म्हणाले?

संगमनेर मधील राजकारणावर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 8 वेळा मी निवडून आलो. 40 वर्षे आमदार आहे. 5 वर्षात स्तर घालवला आहे. फुटीचे राजकारण झालं, खालच्या स्थराला गेले. चॅनेलवर दाखवू नका, लोकांमध्ये जातं. संगमनेरचा विकास झाला, बंधुभाव आहे. काही लोकांना ते पाहवत नाही, शिवराळ भाषा वापरली. दुर्दैवाने संगमनेरच्या वाट्याला आले. माझ्या विरोधकांना सुद्धा आवडलं नाही, असं थोरांनी म्हटलंय.

Non Stop LIVE Update
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.