मी विधानसभेसाठी संगमनेर मधूनच इच्छुक- माजी खासदार सुजय विखे पाटील

लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी विधानसभेसाठी संगमनेर मधूनच इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. यावेळी बोलताना सुजय विखेंनी काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

मी विधानसभेसाठी संगमनेर मधूनच इच्छुक- माजी खासदार सुजय विखे पाटील
सुजय विखे पाटील
Follow us
| Updated on: Sep 16, 2024 | 11:20 PM

आताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉ.सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला होता. शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी त्यांचा पराभव करत मोठा धक्का दिला होता. सुजय विखे पाटलांचा पराभव भाजपवर नामुष्की ओढावली होती. आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्येही सुजय विखे पाटलांनी इच्छा व्यक्त केलीये. राहाता तालुक्यातील खडकेवाके येथे नागरी सत्कारादरम्यान सुजय विखे बोलत होते. या सत्कार सोहळ्यावेळी विखेंनी थेट काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांवर टीका केली.

संगमनेरमध्ये एकही चारी करायला कुणी जेसीबी देत नाही. मी मागच्या आवर्तनाला गेलो तर फ्लेक्स बोर्डवर शेजारच्या आमदाराचा एक हात वरती असलेला फोटो होता, जलनायक म्हणून…दुसऱ्या आवर्तनाला गेलो तर दोन हात वरती असलेला फोटो होता. तिसऱ्या आवर्तनात काय वरती करतील मला माहीत नाही. आता आपल्याला तिसऱ्या फ्लेक्स बोर्डची वाट पहावी लागेल. धरणात जाऊन जलपूजन करतात मात्र चारी खंदायला एक जेसीबी देऊ शकत नाही असं म्हणत सुजय विखेंनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.

मागच्या विधानसभेत जो निकाल होता त्यापेक्षा जास्त मताधिक्य राधाकृष्ण विखे पाटलांना सुजय विखे मिळवून देणार आहे. राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेले काम आपल्याला महाराष्ट्राला दाखवून द्यायचे आहे. आपले व्यक्तिगत हेवेदावे आणि संघर्ष बाजूला ठेवा. जे लोक आज भाषण करताय ते पाच वर्षे तुम्हाला दिसणार नाही. आम्हीच सातत्याने तुमच्या सोबत असतो. विधानसभा लागण्यापूर्वी शिर्डी विधानसभेत सगळ्यांना दहावे, मयती, लग्न, गणपती आठवतात. निवडणुकीत पडल्यानंतर परत कुणी दिसत नाही. मी पडलो मात्र दुसऱ्याच दिवशी कामाला लागलो. तुमचा विश्वास आमच्या परिवारावर कायम ठेवा, असं आवाहनही सुजय विखेंनी केलं.

आपल्या मतदारसंघात जात – धर्म नाही तर माणूस म्हणून काम केली जातात. इथे कुणीही जात-धर्माच्या नावावर विष कालवण्याचा प्रयत्न केला तर मला त्याच्यावर कारवाई करावी लागेल. ती कारवाई काय असेल ते माईकवर बोलण्याचा विषय नाही. काही लोक महाराष्ट्र कोणत्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करताय? हे योग्य नाही. जात – धर्म आड आला तर माझ्यासारखा माणूस विकास करूनही पराभूत होतो. विकास नसेल तर राजकारण करण्याची माझी इच्छा नाही. लोकसभेत जे गलिच्छ वातावरण झालं त्यामुळे माझ्यासारखा काम करणारा व्यक्ती पराभूत झाला. चांगला माणूस हारला तर त्या भागातील पुढची 10 वर्षे आणि पुढची पिढी अंधारात जाते. चांगला माणूस हारला तर त्या भागातील पुढची 10 वर्षे आणि पुढची पिढी अंधारात जाते. पराभवाने मला काही फरक पडला नाही. एखाद्या मंत्र्यासाठी जेव्हढी गर्दी होत नाही तेव्हढी गर्दी आजही माझ्यासाठी होते, असंही सुजय विखे पाटील म्हणाले.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.