Video : ‘माझ्या मुलाला मारण्यासाठी त्यांनी पूजा घातली’; निलेश लंकें यांच्या आईचे खळबळजनक आरोप 

महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखेंचा पराभव केला. या निकालानंतर लंकेंच्या आईंनी धक्कादायक आरोप केले आहेत. नेमकं काय म्हणाल्या जाणून घ्या.

Video : 'माझ्या मुलाला मारण्यासाठी त्यांनी पूजा घातली'; निलेश लंकें यांच्या आईचे खळबळजनक आरोप 
Follow us
| Updated on: Jun 05, 2024 | 5:23 PM

लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाल्याचं पाहायला मिळालं. महायुतीला 17 तर महाविकास आघाडीच्या 30 जागांवर यश मिळालं आहे. भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला असून भाजपच्या अनेक दिग्गजांचा पराभव या निवडणुकीमध्ये झाला. शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनीही अहमदनगरमध्ये भाजपच्या सुजय विखे-पाटील यांच पराभव करत धक्कादायक निकालाची नोंद केली. निलेश लंकेंनी अहनगरनध्ये मोठा उलटफेर केला. या निकालानंतर लंकेच्या आईंनी खळबळजनक आरोपे केले आहेत.

निलेश लंकेंच्या आई काय म्हणाल्या?

निवडणूक काळात माझ्या मुलाला मारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असून मोठी पूजा घातल्याच लंके यांच्या आईने म्हटले आहे. तर निवडणूक काळात मोठी धास्ती वाटत होती कारण हे मोठे लोक आहेत मशीन मध्ये घोटाळा करू शकतात अशी चर्चा होती, एवढंच नाही तर कुठे अपघात व्हावा यासाठी मोठ मोठ्या पूजा घालण्यात आल्या असल्याचा खळबळजनक आरोप लंके यांच्या आई शकुंतला लंके यांनी केला आहे.

अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील तर मविआकडून निलेश लंके यांना तिकीट देण्यात आलं होतं. सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार होते. तर लंके विद्यमान आमदार, शरद पवार गटाकडून उभे असलेल्या निलेश लंके यांनी विखेंचा पराभव करत विजयश्री मिळवला. ग्रामपंचायतपासून सुरू झालेला लंके यांचा प्रवास आता खासदारकीपर्यंत पोहोचला आहे.

शरद पवार गटाकडून उभे राहिलेल्या निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा 29 हजार 317 मतांनी पराभव केला आहे. सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यापासूनच निलेश लंके आणि सुजय विखे-पाटील यांच्याच अटीतटीची लढाई  सुरू होती. निलेश लंके आघाडीवर तर कधी सुजय विखे पाटील आघाडीवर जात होते अखेर लंके यांनी गुलाल उधळला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.