मतदानाच्या दिवशी रोहित पवार यांचा गंभीर आरोप; म्हणाले, नावापुढे काळा डाग…
NCP Sharad Pawar Group Leader Rohit Pawar Allegation : रोहित पवार यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नावासमोर काळा डाग लावल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. याबाबत रोहित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष आहे. वाचा सविस्तर...
कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. माझ्या नावाच्या डमी उमेदवाराच्या नावापुढे काळे डाग लावले आहेत, असं गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. नान्नज आणि झिक्री यासोबतच इतर मतदान केंद्रांना भेट दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. गरज पडल्यास या सगळ्या भागातील सीसीटीव्ही फुटेज मागवणार आहे, असं रोहित पवार म्हणालेत. या संदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे.
रोहित पवार यांनी एक व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यातून आपल्या नावाच्या डमी उमेदवाराच्या नावापुढे काळे डाग लावल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज मागवल्याचं रोहित पवार यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
रोहित पवार यांचं ट्विट
सकाळी माझ्या मतदारसंघातील नान्नज आणि झिक्रीसह विविध बुथला भेट दिली असता तेथील परिस्थिती काय होती, याचा हा आढावा.. काही #EVM मशीनवर माझ्या विरोधकांच्या आणि माझ्या नावाच्या डमी उमेदवारांच्या नावापुढं काळा डाग लावल्याचंही निदर्शनास आलं असून हा रडीचा डाव आहे. हा काळा डाग हटवण्याची मागणी तेथील बुथ प्रमुखाकडं करण्यात आली. तसंच आमच्या मागणीनुसार मतदारसंघात संवेदनशील ठिकाणच्या बुथवर #CCTV कॅमेरे लावण्यात आले असून गरज पडल्यास हे सीसीटीव्ही फुटेज आम्ही मागवू शकतो. त्यामुळं हे #CCTV कॅमेरे कायम सुरु राहतील, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, ही विनंती!
सकाळी माझ्या मतदारसंघातील नान्नज आणि झिक्रीसह विविध बुथला भेट दिली असता तेथील परिस्थिती काय होती, याचा हा आढावा.. काही #EVM मशीनवर माझ्या विरोधकांच्या आणि माझ्या नावाच्या डमी उमेदवारांच्या नावापुढं काळा डाग लावल्याचंही निदर्शनास आलं असून हा रडीचा डाव आहे. हा काळा डाग हटवण्याची… pic.twitter.com/BDpL7WDhm3
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 20, 2024
कर्जत जामखेडमध्ये चुरशीची लढत
कर्जत- जामखेड मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होत आहे. विद्यमान आमदार रोहित पवार यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात माजी मंत्री मैदानात आहेत. भाजपकडून माजी मंत्री राम शिंदे निवडणूक लढवत आहेत. यावेळी इथे चुरशीची लढत होणार आहे. 2019 ला रोहित पवार यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हा मंत्री असलेल्या राम शिंदे यांचा रोहित पवारांनी पराभव केला होता. यंदा पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध पवार अशी लढत आहे. इथं कोण जिंकणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.