Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वकील दाम्पत्याचा खून कसा केला? माफीच्या साक्षीदाराने कोर्टात सांगितला घटनाक्रम

राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या डोक्यात प्लास्टिकच्या पिशव्या घालून त्यांचा निर्घृणपणे खून केल्याची, आणि पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांचे मृतदेह साडीत गुंडाळून विहिरीत फेकल्याची कबुली माफीचा साक्षीदार असलेला हर्षद ढोकणे याने अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात दिली आहे.

वकील दाम्पत्याचा खून कसा केला? माफीच्या साक्षीदाराने कोर्टात सांगितला घटनाक्रम
वकील दाम्पत्याचा खून कसा केला? माफीच्या साक्षीदाराने कोर्टात घटनाक्रम सांगितला
Follow us
| Updated on: Dec 11, 2024 | 6:16 PM

बहुचर्चित अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकील राजाराम आढाव आणि वकील मनीषा आढाव खून खटल्याची जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील हर्षद ढोकणे हा माफीचा साक्षीदार बनला आहे. आरोपी ढोकणे याने मंगळवारी झालेल्या सरतपासणीत खुनाचा घटनाक्रम न्यायालयासमोर कथन केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी किरण दुशिंग, भैया ऊर्फ सागर खांदे, शुभम महाडिक, हर्षल ढोकणे, कृष्णा उर्फ बबन मोरे यांना अटक केली आहे. या प्रकरणी आरोपी हर्षल ढोकणे हा माफीचा साक्षीदार झाला आहे. त्याने आज कोर्टात वकील दाम्पत्याची हत्या कशी करण्यात आली? याबाबत सविस्तर कबुली जबाब दिला.

माफीच्या साक्षीदाराने नेमकी काय साक्ष दिली?

राहुरी येथील न्यायालयातून आढाव दाम्पत्याचे अपहरण करून 25 जानेवारीला त्यांच्याच मानोरी येथील बंगल्यावर नेण्यात आले होते. तिथे मुख्य आरोपी किरण दुशिंग यांनी वकील राजाराम आढाव यांच्याकडे पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी वकील दाम्पत्याला त्यांच्याकडे असलेल्या चारचाकी वाहनातून ब्राह्मणी गावातील इंग्लिश मीडियम शाळेच्या मोकळ्या जागेत नेले. वकील दाम्पत्याचा खून केल्यानंतर उंबरे गावातील स्मशानभूमीच्या विहिरीजवळ जाऊन मृतदेह साडीत गुंडाळला आणि विहिरीत टाकून दिल्याची कबुली माफीच्या साक्षीदाराने कोर्टासमोर दिली आहे.

वकील दाम्पत्याची हत्या केल्यानंतर 4 ते 5 लाख रुपये मिळणार होते. मात्र मुख्य आरोपी किरण दुशिंग याने प्रत्येकी फक्त 10 हजार रुपये दिले, असे माफीचा साक्षीदार ढोकणे याने आपल्या जबाबात म्हटलं आहे. आरोपीने राजाराम आढाव यांच्या डोक्यात प्लास्टिकची पिशवी घातली. त्यावेळी त्यांच्या पत्नी मनीषा आढाव या ओरडल्या, “माझ्या आई-वडिलांना मारले, आता आम्हालाही मारा” असे त्या आरोपी किरण दुशिंग याला म्हणाल्या. त्यांच्या या विधानामागे नेमका काय हेतू होता? हे पुढील तपासात समोर येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत आज जिल्हा न्यायालयात उलट तपासणी होत आहे. या उलट तपासणीत नेमके आणखी कोणते मुद्दे समोर येतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.