नगरच्या मातीत आर. आर. आबांच्या लेकाचं तुफान भाषण; रोहित पाटील म्हणाले, स्वाभिमान-लाचारीमध्ये फरक…

Rohit R R Patil on Maharashtra Politics in Ahmednagar South Loksabha Constituency : अहमदनगरमध्ये निलेश लंके यांच्या प्रचारासाठी सभा होते आहे. या सभेत आर, आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी नगरमध्ये भाषण केलं. त्यांच्या भाषणाची जोरदार चर्चा होतेय. वाचा सविस्तर...

नगरच्या मातीत आर. आर. आबांच्या लेकाचं तुफान भाषण; रोहित पाटील म्हणाले, स्वाभिमान-लाचारीमध्ये फरक...
Follow us
| Updated on: May 11, 2024 | 5:48 PM

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी पाथर्डी बाजारतळावर प्रचारसभा झालाी. या सभेत दिवंगत नेते आर. आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी भाषण केलं. दोन मतदारसंघाची चर्चा सबंध राज्यात सुरु आहे ते म्हणजे बारामती आणि अहमदनगर दक्षिण… बारामती कशी निवडणुकीत सुरु आहे हे सांगायची गरज नाही. मात्र नगर दक्षिण मध्ये हुकूमशाही स्वाभिमान आणि लाचारी चा फरक करणारी ही निवडणूक आहे. नगर दक्षिणची निवडणूक चर्चेत असण्याचे कारण आहे की स्वाभिमानामध्ये आणि लाचारीमध्ये फरक करणारी निवडणूक यंदाची आहे, असं रोहित पाटील म्हणाले.

रोहित पवार काय म्हणाले?

एका बाजूला हुकूमशाही आहे आणि दुसऱ्या बाजूला नगर दक्षिणमधले सर्व लोक… एकत्रितपणे येऊन लोकशाही टिकवण्यासाठी स्वाभिमानाने उभं राहणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर अनेक ठिकाणाहून माहिती घेतल्यानंतर निलेश लंकेचा विजय होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असंही रोहित पाटील म्हणाले.

निलेश लंके यांच्या रूपाने अत्यंत प्रामाणिक उमेदवार आपल्या सर्वांना मिळालेला आहे. जो लोकांसाठी काम करतो असं उमेदवार आपल्याला सर्वांना मिळालेला आहे. कोरोना काळामध्ये निलेश लंकेने या मतदारसंघातल्या या जिल्ह्यातल्या सर्वसामान्यांसाठी दवाखाना चालू केला. नगर जिल्हा सबंध जगाचा नकाशा वरती आणण्याचं काम पुन्हा एकदा निलेश लंके यांनी केलं. आता हेलिकॉप्टरमधून फिरणारी लोक आपल्याला पाहिजे का? सर्व सामान्य लोकांच्या मध्ये जाऊन लोकांच्यासाठी काम करणाऱ्या नेतृत्व आपल्याला पाहिजे? भाजपचे लोक यावेळेस निलेश लंके उमेदवाराला हलक्यात घेत होते. पूर्वी पाच लाखात आम्ही निवडून येऊ म्हणणारे आज गल्लीबोळात फिरायला लागले आहेत, असं रोहित पाटील म्हणाले.

मोदींच्या सभेवर टीका

देशाच्या पंतप्रधानांची सभा ही आपल्या साधा उमेदवाराला पाडण्यासाठी आज नगर जिल्ह्यासारख्या ठिकाणी झाली.आता उमेदवार जर आमचा साधा असता तर देशाच्या पंतप्रधानांना नगर जिल्ह्यामध्ये यायची गरज भासली असती का? 13 तारखेला आपल्याला निलेश लंकेना मोठ्या मताधिक्याने विजय करायचा ही भूमिका आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे. मला आल्यावर समजलं की काही दिवसांपूर्वी इथं डाळ साखर वाटली गेलेली आहे. आता डाळ साखर वाटून खासदार बनते पहिल्यांदाच ऐकलं. आमच्याकडे डाळ वाटणाऱ्याला साखर वाटणाऱ्याला नवीन रेशन दुकान आम्ही टाकून देत असतो. टाळ वाटून खासदार होता येत नसता मात्र रेशन दुकानदार नक्की होता येतं, असं रोहित पाटील म्हणाले.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.