संगमनेरमधील वादग्रस्त विधान प्रकरणाला नवं वळण; जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल

Case Registered Against Jayshree Balaasaheb Thorat : जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परवा दिवशी भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरातांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल झाला आहे. वाचा सविस्तर बातमी...

संगमनेरमधील वादग्रस्त विधान प्रकरणाला नवं वळण; जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल
जयश्री थोरातImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 27, 2024 | 12:21 PM

संगमनेरमधील वादग्रस्त प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. वाहनांचे नुकसान करून विखे समर्थकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. बाळासाहेब थोरातांच्या बंधुंसह निकटवर्ती कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 109 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालाय. दुसऱ्या प्रकरणात आचासंहितेत आंदोलन केल्याने आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला आहे. थोरात तांबेसह मविआचे एक खासदार आणि दोन उमेदवारांसह अनेक नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल

आचारसंहिता असताना जमाव बंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल संगमनेर तालुका पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यामुळे जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यासह 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आचारसंहिता भंग करत जमावबंदी आदेशाचा उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये महिला नेत्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले. भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या संकल्प सभेत बोलताना भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरांतांच्या मुलीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर थोरातांचे समर्थक आक्रमक झाले त्यांनी सुजय विखेंच्या गाड्यांची तोडफोड केली. वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं. हा आचारसंहितेचा भंग असल्याचं म्हणत जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

जयश्री थोरात आक्रमक

गुन्हा दाखल होताच जयश्री थोरात आक्रमक झाल्या आहेत. संगमनेर शहर पोलिस ठाण्यावर महिलांसह मोर्चा काढण्यात आला आहे. जयश्री थोरातांसह अनेक महिला एकत्र आल्या आहेत. राजकीय दबावाचा वापर करून आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्व सामान्य महिलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. मी घाबरत नाही. पोलिसांनी मला अगोदर अटक करावी, असं जयश्री थोरात म्हणाल्या आहेत.

वसंतराव देशमुख यांचं वादग्रस्त वक्तव्य

भाऊसाहेब थोरात यांची नात… ती तर बोलती म्हणत्यात… माझा बाप सगळ्याचा बाप… काही कळत नाही. तुला सुद्धा पोरं कशी झाली? हा प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा. नाहीतर आम्ही जर निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. सुजयदादा तिला प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना… सगळ्या तालुक्याला माहिती आहेत, असं वसंतराव देशमुख म्हणालेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.