छगन भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांवर सुनिल तटकरे यांचं स्पष्ट भाष्य; म्हणाले, ते आमचे…

Sunil Tatkare on Chhagan Bujbal : छगन भुजबळ राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याची चर्चा होत आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता राष्ट्रवादीतूनच प्रतिक्रिया समोर आली आहे. सुनील तटकरे यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर...

छगन भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांवर सुनिल तटकरे यांचं स्पष्ट भाष्य; म्हणाले, ते आमचे...
सुनील तटकरे, छगन भुजबळImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 19, 2024 | 3:50 PM

राज्यसभेच्या उमेदवारी न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस परिवार आणि या परिवाराचे अजितदादा पवार हे प्रमुख आहेत. छगन भुजबळ साहेब देखील या परिवाराचे ज्येष्ठ घटक आहेत. त्यांच्या विधानाच्या अलीकडचा आणि पलीकडचा भाग मी पाहत नाही. तोपर्यंत यावर बोलणं योग्य नाही. पक्ष चालवताना अध्यक्ष नेतृत्व करतात हे भुजबळांना देखील मान्य आहे. छगन भुजबळ आमच्या नेत्यांसोबत पक्ष सोबत आहेत. त्यांच्या नेतृत्वातच विधानसभा निवडणुका लढवल्या जातील, असं सुनील तटकरे म्हणालेत.

सुनील तटकरेंनी घेतलं साईबाबांचं दर्शन

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी साईबाबांच दर्शन घेतलं. दोन दिवसीय जिल्हा दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज शिर्डी आणि अकोले मतदारसंघात आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला सुनील तटकरे यांच्यासह रुपाली चाकणकर देखील आढावा बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे विविध मुद्द्यांवर बोलते झाले.

लोकसभेच्या निकालावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. यावरही सुनील तटकरे यांनी भाष्य केलंय. लोकसभेला आम्हाला चार जागा मिळाल्या. परभणीची जागा रासपसाठी आम्ही सोडली. जागावाटप करताना सीटिंग जागेचा प्राधान्याने विचार केला जातो. आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र याचा विधानसभा निवडणुकांवर परिणाम होईल असं मला वाटत नाही, असं सुनील तटकरे म्हणाले.

अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांचं एक विधान सध्या चर्चेत आहे. यावर बोलताना भाजप अजित पवारांना टार्गेट करत नाही. काही हितशत्रू जाणीवपूर्वक अश्या बातम्या प्रसारित करताय. महायुतीत संभ्रम निर्माण करण्यासाठी अशी वक्तव्य केले जातात. अमोल मिटकरी यांनी माहिती घेऊनच कोणत्याही विषयी बोलल पाहिजे अशा सूचना मी त्यांना दिल्या आहे, असं तटकरेंनी म्हटलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.