Devendra Fadnavis : फडणवीसांविरोधात विरोधक आक्रमक; सुषमा अंधारे यांची जहाल टीका, केली राजीनाम्याची मागणी

Sushma Andhare on Devendra Fadnavis : बदलापूर येथील लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात विरोधक आक्रमक झाले आहेत. बदलापूरच्या घटनेवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या राजीनामाची मागणी केली आहे.

Devendra Fadnavis : फडणवीसांविरोधात विरोधक आक्रमक; सुषमा अंधारे यांची जहाल टीका, केली राजीनाम्याची मागणी
देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी
Follow us
| Updated on: Aug 20, 2024 | 4:46 PM

बदलापूर येथील लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार पकरणात विरोधक आक्रमक झाले आहेत. बदलापूरच्या घटनेवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. एकूणच गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी लागलेला वेळ आणि हयगय यावरुन आज सकाळपासून बदलापूरात एकच संताप व्यक्त झाला. रेल्वेसह बस सेवा कोलमडली. आंदोलन चिघळले. शाळेत तोडफोड करण्यात आली. जमाव आक्रमक झाला. या घटनेनंतर अंधारे यांनी फडणवीसांवर जहाल टीका केली.

फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी

मागच्या साडेसात वर्षापासून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. तर सात वर्षात महिला अत्याचाराच्या घटना सर्वाधिक झाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. खरं सत्तेचा मोह नसेल आणि गृहमंत्री म्हणून वारंवार अपयशी ठरत असेल तर देवेंद्र फडणवीस राजीनामा का देत नाही असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवर उडाला आहे पोर्श कारचे प्रकरण, वरळीतील मिहीर शाह आणि पनवेल ची घटना असेल, मात्र देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरले आहे अस टोला त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्रातील आयांची विनंती आहे आपल्याला झेपत नाही तर राजीनामा द्या, तुम्हाला खरच लाडक्या बहिणीची काळजी आहे तर त्या सुरक्षित असेल तरच त्यांना अश्वस्त वाटेल असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

कट्टर पंथीयांचा काय बंदोबस्त केला?

नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला अकरा वर्षे पूर्ण होतात एक अत्यंत हुशार सहिष्णुतावादी विचारवंत कट्टर पंथीयांमुळे मारला जातो पण कट्टर पंथीयांचा विचार संपत नाही धर्म विद्वेषी वक्तव्य करणाऱ्या रामगिरी नावाच्या व्यक्तीच्या पाठीशी स्वतः मुख्यमंत्री उभे राहत असतील तर कट्टर पंथीयांचा विचार हा असाच फोफावत राहील पुन्हा भविष्यात एखादा दाभोळकर होऊ नये यासाठी कट्टर पंथीयांचा बंदोबस्त काय करणार आहात असा सवाल सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.