या ताईचे पराक्रम पाहिले ना…; सुजय विखेंच्या सभेत बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल वादग्रस्त वक्तव्य गुन्हा दाखल

Vasantrao Deshmukh Controversial statement About Jayashree Thorat : भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. वाचा सविस्तर......

या ताईचे पराक्रम पाहिले ना...; सुजय विखेंच्या सभेत बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल वादग्रस्त वक्तव्य गुन्हा दाखल
जयश्री थोरात, सुजय विखेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 26, 2024 | 8:18 AM

सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमधील धांदरफळ इथं माजी खासदार, भाजपचे नेते, सुजय विखे पाटील यांची संकल्प सभा झाली. या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची लेक जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यामुळे संगमनेर मतदारसंघात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यानंतर वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

वसंतराव देशमुख यांचं वादग्रस्त वक्तव्य

भाऊसाहेब थोरात यांची नात… ती तर बोलती म्हणत्यात… माझा बाप सगळ्याचा बाप… काही कळत नाही. तुला सुद्धा पोरं कशी झाली? हा प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा. नाहीतर आम्ही जर निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. सुजयदादा तिला प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना… सगळ्या तालुक्याला माहिती आहेत, असं वसंतराव देशमुख म्हणालेत.

वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा दाखल

वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची राज्यभर चर्चा होत आहे. वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. स्वत: सुजय विखे यांनीही या विधानाचा निषेध केला आहे. वसंतराव देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री आणि बहिण दुर्गा तांबे यांनी पोलीस ठाण्यासमोर बसून निषेध केला आहे.

सुजय विखेंची प्रतिक्रिया

जयश्री यांच्याबाबत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर तणावाचं वातावरण झालं आहे. सभा आटोपून परत जाणा-या सुजय विखे पाटील यांच्या ताफ्यातील काही गाड्या अडवल्या गेल्या आणि त्यांची तोडफोड करत चिखली गावाजवळ जाळपोळ करण्यात आली आहे. यावेळी सुजय विखे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशाप्रकारे वक्तव्य करणं चुकीचं आहे. वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. पण पोलिसांनी गाड्यांची जाळपोळ करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा. दंगल घडवण्याचं काम कोण करत आहे? हे पोलिसांनी पाहावं, अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा.
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा.
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'.
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?.
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?.
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक.
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?.
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'.
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने.