AIMA Election | नाशिकमध्ये उद्योजकांच्या निवडणुकीत गुलाल ‘एकता’चा, कोणाला किती मिळाल्या जागा?

नाशिकमध्ये 'आयमा' (AIMA) संघटेचे तब्बल 2 हजारांच्यावर उद्योजक सभासद आहेत. त्यामुळे या संघटनेची निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते.

AIMA Election | नाशिकमध्ये उद्योजकांच्या निवडणुकीत गुलाल 'एकता'चा, कोणाला किती मिळाल्या जागा?
नाशिकमध्ये 'आयमा' निवडणुकीत विजयी झालेल्या एकता पॅनलच्या उमेदवारांनी जोरदार जल्लोष केला.
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 10:02 AM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) अतिशय चुरशीच्या आणि बहुचर्चित ठरलेल्या उद्योजकांच्या अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (आयमा) द्वैवार्षिक निवडणुकीत अखेर सत्ताधारी एकता पॅनलने बाजी मारली आहे. कार्यकारिणी समितीच्या 24 तर पदाधिकाऱ्यांच्या 6 जागांवर एकता पॅनलच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळवला. विशेष म्हणजे विरोधात असलेल्या उद्योग विकास पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही. ‘आयमा’ (AIMA) संघटेचे तब्बल 2 हजारांच्यावर उद्योजक सभासद आहेत. त्यामुळे या संघटनेची निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते. यंदा आयमाच्या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनलने नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. सोबतच मावळते अध्यक्ष वरुण तलवार, ज्येष्ठ उद्योजक राधाकृष्ण नाईकवाडे यांनीही रिंगणात उडी घेतली होती. उद्योग विकास पॅनलने बहुजन चेहरा देणाऱ्या पॅनलची बांधणी केली. पॅनलेचे नेते आणि निमा संघटनेचे माजी अध्यक्ष शशिकांत जाधव, तुषार चव्हाण, कैलास आहेर यांनी निवडणुकीचे नेतृत्व केले. सोबतच ब्राह्मण बिझनेस नेटवर्कचे संस्थापक श्रीपाद कुलकर्णी यांनीही निवडणुकीत उडी घेतली. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची झाली.

अध्यक्षपदी पांचाळ

अध्यक्षपदाच्या जागेवर एकता पॅनलचे निखिल पांचाळ यांनी उद्योग विकास पॅनलचे संजय महाजन यांचा 535 मतांनी पराभव केला. तर उपाध्यक्षपदी एकता पॅनलच्या राजेंद्र पानसरे यांनी पटकावले. त्यांनी उद्योग विकास पॅनलचे उमेदवार श्रीपाद कुलकर्णी यांचा 500 मतांनी पराभव केला. ऑनलरेबल जनरल सेक्रेटरी पदावरही एकताचे ललित बुब विजयी झाले. त्यांनी उद्योग विकास पॅनलचे एन. डी. ठाकरे यांच्यावर 447 मतांनी विजय मिळवला. तर जनरल सेक्रेटरीच्या 2 जागांवरही एकता पॅनलने बाजी मारली. त्यात अनुक्रमे योगिता आहेर आणि गोविंद झा यांनी कैलास अहेर व जयंत पवार यांचा पराभव केला.

अशी असेल कार्यकारिणी

‘आयमा’ निवडणुकीत एकता पॅनलने बाजी मारल्याने अपेक्षेप्रमाणे कार्यकारिणीवर एकताचे पूर्ण वर्चस्व आहे. त्यात जितेंद्र आहेर, जयचंद आलिमचंदानी, बजाज सुमित, हर्षद बेळे, अविनाश बोडके, सुदर्शन डोंगरे, विराज गडकरी, राहुल गांगुर्डे, मेघा गुप्ता, जयंत जोगळेकर, गौरव धारकर, हर्षद ब्राह्मणकर, हेमंत खोंड, अविनाश मराठे, विनायक मोरे, राधाकृष्ण नाईकवाडे, जयंत पवार, जगदीश पाटील, के. एन. पाटील, देवेंद्र राणे, मनीष रावल, दिलीप वाघ, प्रमोद वाघ, रवींद्र झोपे यांचा समावेश असणार आहे. दरम्यान, निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळून आनंद साजरा केला.

इतर बातम्याः

Nivruttinath | 800 वर्षांपूर्वी संजीवन समाधी, यशापासून निवृत्ती, ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू; संत निवृत्तीनाथांची यात्रोत्सवानिमित्त अनोखी ओळख!

Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?

Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.