Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GST थकबाकी वाढत गेल्यास दोन वर्षात एक लाख कोटींवर, जीएसटी परिषदेत अजित पवारांकडून भीती व्यक्त

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित 41 व्या जीएसटी परिषदेत राज्याच्या वतीने अर्थमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते.

GST थकबाकी वाढत गेल्यास दोन वर्षात एक लाख कोटींवर, जीएसटी परिषदेत अजित पवारांकडून भीती व्यक्त
Follow us
| Updated on: Aug 27, 2020 | 3:42 PM

मुंबई : वस्तू व सेवाकरातील नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जुलै 2020 पर्यंत 22 हजार 534 कोटी रुपयांची थकबाकी येणे आहे. ही रक्कम वेळेवर न मिळता अशीच वाढत गेल्यास दोन वर्षात एक लाख कोटींवर जाईल, अशी भीती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केली. ते 41 व्या वस्तू व सेवाकर (जीएसटी) परिषदेत बोलत होते. (Ajit Pawar attends 41st meeting of the GST Goods and Services Tax Council)

जीएसटीचा हिस्सा आणि थकबाकी राज्यांना वेळेत देणं, राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढणं ही जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारली असल्याने ते कर्तव्य पार पाडण्यासाठी केंद्रानेच कमी व्याजदराने कर्ज घेऊन राज्यांना निधी उपलब्ध करावा, अशी मागणी अजित पवार यांनी जीएसटी परिषदेत केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित 41 व्या जीएसटी परिषदेत राज्याच्या वतीने अर्थमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते. मंत्रालयातील त्यांच्या दालनातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिषदेत सहभागी होताना त्यांनी राज्याची बाजू मांडली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जीएसटीतील नुकसान भरपाईची रक्कम केंद्र सरकारकडून वेळेवर मिळत नाही, त्यामुळे सर्वच राज्यांसमोर आर्थिक संकट आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. देशातील जवळपास सगळी राज्ये सध्या कोरोना संकटाशी लढत असल्याने केंद्राकडून अधिक निधी मिळालाच पाहिजे. केंद्रानं महसुल गॅरन्टी घेतली असल्यानं राज्यांना भरपाईचा निधी वेळेवर देणं ही केंद्राची जबाबदारी आहे. केंद्राने त्यासाठी कर्ज घ्यावे. कारण त्यांना राज्यांपेक्षा कमी दराने कर्ज उपलब्ध होऊ शकते, असे मतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीएसटी परिषदेत व्यक्त केले.

हेही वाचा : मास्क, टेस्टिंग किट, व्हेंटिलेटर्सवरील GST माफ करा, अजित पवारांची केंद्राकडे मागणी

अजित पवार यांनी महाराष्ट्रासह अन्य राज्यांची बाजू मांडताना स्पष्ट केले की, आर्थिक मर्यादांमुळे राज्यांना कर्ज घेणे शक्य नाही. केंद्र सरकारला अल्पदरात कर्ज उपलब्ध होऊ शकते, ती सोय राज्य सरकारांना नाही. राज्यांनी जादा व्याजदराने कर्ज घेतल्यास त्याचा अकारण सेसवर परिणाम होईल व अंतिम बोजा ग्राहकांवर पडेल. राज्यांनी खुल्या बाजारातून कर्ज घेण्याचा प्रयत्न केल्यास तिथेही व्याजदर वाढण्याची व कर्ज मिळणं दुरापास्त होण्याची भीती आहे. ही वस्तुस्थिती असल्याचे अजित पवारांनी जीएसटी परिषदेत लक्षात आणून दिले.

राज्यांना जीएसटी नुकसानीपोटी भरपाई देण्यासाठी सुरु केलेल्या सेसची कालमर्यादा पाच वर्षांसाठी म्हणजे 2022 पर्यंत आहे. ही कालमर्यादा वाढवून मिळावी. केंद्राकडून राज्यांना देय निधी वेळेत देण्यासाठी केंद्र सरकारनेच कर्ज घ्यावं आणि राज्यांना ती रक्कम द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली. केंद्र सरकारकडून राज्यांना दिलेल्या रकमेची वसुली सेसची कालमर्यादा वाढवून करावी व संपूर्ण वसुली होईपर्यंत सेसचा कालावधी वाढवण्यात यावा, अशी सूचनाही अजित पवार यांनी केली. (Ajit Pawar attends 41st meeting of the GST Goods and Services Tax Council)

देशातील सर्वात प्रगत आणि आघाडीचं राज्य असलेल्या महाराष्ट्रासमोर, कोरोनामुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट अभूतपूर्व आहे, या संकटावर मात करण्याचा आमचा निर्धार असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत, केंद्र सरकारनेही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. राज्यांच्या उत्पन्नाचा वस्तू व सेवाकर अर्थात जीएसटी हा मुख्य स्त्रोत असल्याने केंद्र सरकारने जीएसटीपोटी राज्यांना देय रक्कम व थकबाकी वेळेत द्यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्र्यांनी जीएसटी परिषदेत केली.

केंद्र सरकारने वडीलबंधूची भूमिका बजावत महाराष्ट्रासह अन्य राज्यांनाही आर्थिक संकटातून बाहेर काढावे, ही केंद्राने स्वीकारलेली जबाबदारी व कर्तव्यसुद्धा असल्याचे सांगत अजित पवार यांनी जीएसटी परिषदेत महाराष्ट्राची तसेच अन्य राज्यांचीही बाजू मांडली.

(Ajit Pawar attends 41st meeting of the GST Goods and Services Tax Council)

अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.
ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी
ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी.
ATM: प्रवास करताना पैसे संपले तरी आता धावत्या रेल्वेत पैसे काढता येणार
ATM: प्रवास करताना पैसे संपले तरी आता धावत्या रेल्वेत पैसे काढता येणार.
वाघ्याच्या वादात पडळकरांची उडी, पवारांवर टीकास्त्र तर उदयनराजेंबद्दल..
वाघ्याच्या वादात पडळकरांची उडी, पवारांवर टीकास्त्र तर उदयनराजेंबद्दल...
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला.
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका.