Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी शरद पवारांना काल ही दैवत मानत होतो, आज ही मानतो पण…, अजितदादांचं मोठं वक्तव्य

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात बोलत असताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.

मी शरद पवारांना काल ही दैवत मानत होतो, आज ही मानतो पण..., अजितदादांचं मोठं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 09, 2025 | 9:34 PM

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिपंरी -चिंचवडमध्ये बोलताना चौफेर फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.  ते  विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी शरद पवार यांना काल ही दैवत मानत होतो, आज ही दैवत मानतो, पण तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

अण्णा बनसोडे हे गरीब कुटुंबातील कार्यकर्ते आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून अण्णा बनसोडे यांना विधासभा उपाध्यक्ष केलं. पान टपरी चालवणारे अण्णा आता आमदार आहेत, आधी नगरसेवक होते, आता उपाध्यक्ष झाले आहेत. अण्णा बनसोडे यांना अपयश आले, तेव्हा, गौतम चाबुकस्वार आमदार झाले. परंतु  त्यांनी हार मानली नाही, ते  पुन्हा आमदार झाले. 1991 ला मी इथे आलो तेव्हा गाववाले आणि बाहेरचे अशी चर्चा खूप व्हायची, पण आता अण्णा बनसोडे हे देखील इथलेच झाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. जगातील अनेक देश अमेरिकेत निर्यात करत आहेत. त्यांना याचा फटका बसत आहे. कोविड नंतरचं हे सर्वात मोठं संकट आहे. याला बाजूला सारून आपल्याला पुढे जायचं आहे.

माझ्या हातात हे शहर होतं. महापौर, विरोधी पक्षनेते, हे सर्व मी करायचो, माझा स्वार्थ मी कधी बघितला नाही. जनतेचा विकास करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवला. नदी, कचरा हा महत्वाचा प्रश्न आहे. याबाबत काही जणांचं वेगळं म्हणणं आहे. त्यांच्या बोलण्यात तथ्य असेल तर आणि जनतेच्या अडचणीच ठरणार असेल तर एक पाऊल पुढे मागे टाकू, असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना पुन्हा एकदा अजित पवार यांनी मिष्कील टोला लगावल्याचं देखील पाहायला मिळालं.  लोकसंख्या वाढायला वेळ लागत नाही. लोकांनी मनावर घेतल की लोकसंख्या वाढते, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी.
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.