लाडकी बहीण योजना काय तुमच्या काकाची आहे काय? अजितदादा भरसभेत असं का म्हणाले?

अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते सांगलीमध्ये बोलत होते.

लाडकी बहीण योजना काय तुमच्या काकाची आहे काय? अजितदादा भरसभेत असं का म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 8:55 PM

आज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आता प्रचार सुरू झाला आहे. सध्या लाडकी बहीण योजनेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. लाडकी बहीण योजनेवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पुन्हा एकदा याच योजनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. योजना सगळी विचार करून सुरू केली आहे.  मी दहा वर्ष अर्थमंत्री म्हणून काम केलं आहे, आजही अर्थमंत्री आहे. लाडकी बहीण योजनेतून महिलांना पैशे देण्याचे काम केले, आम्ही त्या ठिकाणी कोणाचा करेक्ट कार्यक्रम करत नाही, करेक्ट कार्यक्रमाने माझ्या माय माऊलींना पैसे मिळणार नाहीत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

योजना सगळी विचार करून सुरू केली आहे.  मी दहा वर्ष अर्थमंत्री म्हणून काम केलं आहे, आजही अर्थमंत्री आहे. लाडकी बहीण योजनेतून महिलांना पैशे देण्याचे काम केले, आम्ही त्या ठिकाणी कोणाचा करेक्ट कार्यक्रम करत नाही, करेक्ट कार्यक्रमाने माझ्या माय माऊलींना पैसे मिळणार नाहीत. सांगायला खूप सोपं आहे, करेक्ट कार्यक्रम करतो, करेक्ट कार्यक्रम करायचं कोणाच्याही हातात नाही, ते जनतेच्या हातात आहे, करेक्ट कार्यक्रम कोणाचा करायचा ते.  लाडकी बहीण योजना बंद करणार, असे म्हणतात, ती योजना काय तुमच्या काकाची आहे का? असा सवाल यावेळी अजित  पवार यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, वाळवा तालुका हा क्रांतीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जाती- जातीत तेढ निर्माण करून कुठलाही देश , राज्य आणि जिल्हा पुढे जाऊ शकत नाही. घड्याळाची परंपरा मोडीत काढायची नाही, त्यामुळे सगळ्यांनी घड्याळ, घड्याळ करायचं.  आम्ही सत्तेला हपापलेलो नाही, ताम्रपट घेऊन कोणी आले नाही. अल्पसंख्याक समाजात नेरिटीव्ही सेट करण्याचा प्रयत्न केला गेला, पण आम्ही सगळ्यांचे आहोत, घटना घडतात, भांड्याला भांड लागतं संसार पुन्हा उभे राहातात असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.