अमोल कोल्हे यांच्या गैरहजेरीवर अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं, भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची रणनीती ठरली
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आगामी काळात भाजपला तोडीसतोड उत्तर देण्यासाठी रणनीती आखली आहे, यामध्ये शरद पवार ते लवकरच जाहीर करणार असल्याचे म्हंटले आहे.
मुंबई : आज मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे उपस्थित नव्हते त्यावर स्वतः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. याशियाय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे निरोप दिला होता. नाशिकमध्ये महानाट्य असल्याने मुंबईतील बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याचे त्यांनी अगोदरच सांगितले होते असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हे हे नाराज नसल्याचे एकप्रकारे ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या नाराजीला पुन्हा ब्रेक लागला आहे. अमोल कोल्हे यांनीतर याबाबत बोलणं टाळलं होतं, त्यामुळे अमोल कोल्हे हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती.
याशिवाय अजित पवार यांनी शरद पवार यांचे ऑपरेशन झाल्यावर शरद पवार हे स्वतः आगामी काळातील रणनीतीवर माहिती देतील.
शरद पवार यांनी प्रमुख नेत्यांना बैठक घेणेचे आदेश दिले होते. त्यानुसार आजच्या मुंबईतील बैठकीत चर्चा करण्यात आली, विशेषतः भाजपच्या विरोधाला कसे उत्तर द्यायचे यावर चर्चा करण्यात आली.
अजित पवार यांनी आजच्या बैठकीत थेट भाजपाचे नाव घेऊन मागील काळात विरोधात किंवा महत्वाच्या विषयाला बगल देण्यासाठी घेतली जाणाऱ्या भूमिकेला विरोध करण्यासाठी चर्चा झाली आहे.
शरद पवार यांना याबाबत मुद्दे कळवून अंतिम चर्चा करून स्वतः शरद पवार याबाबत माहिती देण्यार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.
याशिवाय राज्यात कुठलीही चुक नसतांना बलात्कार केल्याचे गुन्हे दाखल होतात, ही काय मोघालाई आहे का? असेही म्हंटले आहे. त्यावर देखील चर्चा झाल्याचे अजित पवार यांनी म्हंटले आहे.
याशिवाय अजित पवार यांनी आगामी काळातील निवडणुकीबाबत उमेदवार निश्चित करण्याबाबतही लवकरच चर्चा केली जाणार आहे, पदवीधर आणि शिक्षक आमदारांच्या संदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे अजित पवार यांनी म्हंटले आहे.