अजित पवार म्हणाले बदला घ्यायचाय, पोटनिवडणुकीच्या जाहीर सभेत अजित पवार यांनी सांगितलं कारण…
भाजपला धक्का देण्यासाठी पुन्हा आपल्याला ताकदीने काम करून दाखवायचे आहे असं अजित पवार म्हणाले आहे. कोणता बदला घ्यायचा आहे ते देखील अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.
पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी आपल्याला कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक ( Kasba Chinchwad Election ) किती महत्वाची आहे. त्यामागील बदला घेण्याचे कारण काय आहे ? हे सांगितले आहे. चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीच्या वतिने उमेदवार असलेल्या नाना काटे ( Nana Kate ) यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये अजित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल करत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. याशिवाय कार्यकर्त्यांनी पालिकेच्या निवडणुकीत कसं लढायचे आहे ते नंतर ठरवू म्हणत आत्ताची निवडणूक आपल्यासाठी अत्यंत महत्वाची असल्याचे अजित पवार यांनी म्हंटलं आहे.
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अतिशय चांगलं काम केलं पण अचानक मध्ये चटर पटर लोक आले आणि सत्ता गेली. त्यामुळे मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे यांना सोडावं लागलं त्याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे.
विधानपरिषदेत जशी एकच जागा भाजपाला मिळाली असून बाकी ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. ते पाहता भाजपला धक्का देण्यासाठी पुन्हा आपल्याला ताकदीने काम करून दाखवायचे आहे असं अजित पवार म्हणाले आहे.
मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे पायउतार झाले आहे त्याचा बदला शिवसनिकांनो आपल्याला घ्यायचा आहे. या शहरात पहिल्यांदाच मला निवडणूक दिले आहे. काही माणसं आता नाहीत काही वृद्ध झाली आहे.
त्यावेळी शिवसैनिकांचे काम मी पहिली आहे. हिरीरीने काम करायचे. उमेदवार निश्चित करत असतांना मी सर्वांशी बोलत होतो. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची परवानगी घेऊन नाना काटे यांची उमेदवारी जाहीर केली होती.
अपक्ष म्हणून ज्यांचा फॉर्म राहिला आहे. त्यांना सगळ्यांनी विनंती केली होती. पण त्यांनी ऐकली नाही. त्याच्या मागील मात्र बोलवता धनी कोणी तरी वेगळा आहे. त्यामुळे बेडूक कितीही फुगलं तरी खरं नसतं.
आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेला दाखवायचे आहे. कसबा आणि चिंचवडची जागा निवडून आणून दाखवायची आहे. ज्यांचे निधन झाले त्यांना नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर आणि विधानपरीषदेवर आमदार करण्यात माझी मदत राहिली आहे.
मात्र, दुसरीकडे भाजपने चुकीचं काम केलं. मतदान करण्यासाठी दोन्ही दिवंगत आमदारांनी मोठेपणा दाखवून मतदान केलं होतं. स्वार्थपणा भाजपच्या नेत्यांनी केला असं सांगत अजित पवार यांनी हल्लाबोल करत नाना काटे यांनाच महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आणण्याचे आवाहन केले आहे.