शरद पवारांसमोरच अजित दादा हे काय बोलून गेले… भुजबळांनी लावला डोक्याला हात…ठाकरेंना आले हसू…
राष्ट्रावादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शरद पवार यांच्या समोरच पंतप्रधान पदाबाबत केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.
मुंबई : राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात एक अनेकांच्या भुवया उंचवणारे विधान केले आहे. विशेष म्हणजे हे भाषण केले तेव्हा व्यासपीठावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित होते. याशिवाय माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना शुभेच्छा देत असतांना 1999 मध्ये आणखी चार महीने मिळाले असते तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते असे विधान केले, मात्र अजित पवार इथेच थांबले नाही त्यांनी थेट शरद पवार यांच्या मनातील इच्छेबद्दल बोलून दाखविले आहे. अजित पवार यांनी म्हंटलंय आम्हालाही पवार साहेब पंतप्रधान म्हणून बसावे असं वाटत होते पण तसं झालं नाही, काही व्यक्तीच्या नशिबात योग नसतो असे म्हणताच सभागृहात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
अजित पवारांच्या या विधानानंतर काही क्षणातच एकच हशा सभागृहात झाला. यावेळी अजित पवारांचे हे विधान संपताच शरद पवारांच्या उजव्या बाजूला बसलेल्या छगन भुजबळांनी हसत हसत डोक्यालाच हात लावला.
तर शरद पवारांच्या डाव्या बाजूला बसलेल्या उद्धव ठाकरें हसू आवरेना अशी स्थिती झाली होती त्यावेळी त्यांनी तोंडासमोर हात आडवा धरून आपले हसू झाकण्याचा प्रयत्न केला.
पण यावेळी शरद पवारांनी कुठलेही हावभाव न करता हातातील रुमालाने चेहरा पुसला आणि आपल्या बद्दल कुणी काही बोललंच नाही असे दाखवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, छगन भुजबळ यांचीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही, हीच संधी साधत उद्धव ठाकरेंनी देखील भुजबळांना चिमटा काढत शिवसेना सोडली नसती तर मुख्यमंत्री कधीच झाला असता असे म्हंटले आहे.
याशिवाय राज्याच्या प्रमुखापासून ते देशाच्या कृषि आणि संरक्षण खात्याचा पदभार देखील शरद पवार यांनी सांभाळला आहे. मात्र, पंतप्रधान पदाणे त्यांना हुलकावणी दिल्याने अजित पवारांनी ते आज जाहीर बोलून दाखविले आहे.