‘बाबा, तुम्हाला हात जोडून, पाया पडून विनंती करतो…’; अजितदादांनी बाबा आढाव यांना काय साकडे घातले?

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी अजित पवार यांनी आज त्यांची भेट घेतली.

'बाबा, तुम्हाला हात जोडून, पाया पडून विनंती करतो...'; अजितदादांनी बाबा आढाव यांना काय साकडे घातले?
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 4:03 PM

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. विधानसभा निवडणूक आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावर गंभीर आरोप करत बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. दरम्यान शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी देखील बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

अजित पवार यांनी बाबा आढाव यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करताना म्हटलं की,  ईव्हीएमबाबत तक्रार करू नये असं कोर्टाने म्हटलं आहे. तरीही कुणी सिद्ध करून दाखवा. मीही आघाडीत असताना अनेकांनी सांगितलं ईव्हीएममध्ये असं होतं. पण कोणी सिद्ध करून दाखवलं नाही. आता इथं असलेल्यांनी ईव्हीएम हॅक होत असल्याचं दाखवावं आम्ही निवडणूक आयोगाला सांगू, कोर्टाला सांगू, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, मत परिवर्तन करण्यासाठी आम्ही प्रलोभन दिलं असं म्हणता येत नाही. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना या पूर्वीपासून सुरू आहेत. काँग्रेसला यशवंतराव चव्हाण असताना राज्यात 222 जागा मिळाल्या होत्या, आता त्यानंतर सर्वात जास्त जागा महायुतीला मिळाल्या आहेत, हे नाकारून चालणार नाही.  दिलीपराव वळसे पाटील फक्त १५०० मतांनी निवडून आले आहेत. मग आम्ही असं म्हणायचं का की ईव्हीएममध्ये गडबड आहे, त्यामुळे मतं कमी झाली. ईव्हीएम हॅक होतं हे कोणी सिद्ध करून दाखवलं तर मला सांगा. मी पडणार असं लोक सांगत होते. पण मी पडणार नाही हे मला माहीत होतं. ईव्हीएम हॅक होत नाही. लोकांनी मला सांगितलं होतं, आम्ही वरिष्ठांचं ऐकणार नाही, तुम्हालाच मतदान करणार आहोत.

बाबा, तुम्हाला हात जोडून पाया पडून सांगतो आंदोलन मागे घ्या. तुम्ही आत्मक्लेश करू नका. तुम्ही वडीलधारी आहात. तुम्हाला सांगू शकत नाही, पण हात जोडून विनंती आहे. काळजीवाहू सरकारचा प्रतिनिधी म्हणून सांगतो, उद्या शपथविधी झाल्यावर सांगतो. एक नागरीक म्हणून आलोय. कार्यकर्ता म्हणून आलोय. काळजीवाहू सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे. लेकाच्या नात्यानेही आलो आहे, विनंती करतो आंदोलन मागे घ्या असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.