पोलिस, वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ले केलेत, तर…; अजित पवारांचा दम

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कर्तव्य बजावणारे पोलीस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना अजिबात सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा अजित पवारांनी दिला. (Ajit Pawar on Attacks on Police Doctors)

पोलिस, वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ले केलेत, तर...; अजित पवारांचा दम
Follow us
| Updated on: Mar 26, 2020 | 3:42 PM

मुंबई : कोरोना प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापि सहन केल्या जाणार नाहीत. असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. (Ajit Pawar on Attacks on Police Doctors)

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कर्तव्य बजावणारे पोलीस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना अजिबात सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई केली जाईल. वसई, बीड, मालेगावसारख्या ठिकाणी अशा घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या लढ्याला धक्का बसत आहे, अशा शब्दात अजित पवारांनी दम भरला.

मालेगाव मध्य मतदारसंघाचे एमआयएम आमदार मुफ्ती इस्माईल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 353 नुसार आमदारासह इतर दहा जणांवर मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काल रात्री आमदार मुफ्ती यांच्या समक्ष समर्थकांनी सामान्य रुग्णायलातील वैद्यकीय अधीक्षकासह इतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की आणि मारहाण केली होती.

दरम्यान, संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा नियमित सुरु आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होत असलेली गर्दी चिंताजनक आहे. जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन करावे, अशा सूचना दिल्या आहेत. वाई, बारामती शहरांत अशी व्यवस्था केल्याची माहिती अजित पवारांनी दिली.

शहरात एकाकी राहत असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर राहणारे गरीब, बेघर यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी समाजाने, स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावं, असं आवाहन अजित पवारांनी ट्विटरवरुन केलं. पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असंही ते म्हणाले.

(Ajit Pawar on Attacks on Police Doctors)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.