विजय वडेट्टीवारांबाबत ‘त्या’ शब्दामुळे चूक झाली : अजित पवार

विजय वडेट्टीवारांना देण्यात आलेल्या खात्यात 'मदत पुनर्वसन' ऐवजी 'भूकंप पुनर्वसन' असं झाल्याचं अजित पवारांनी सांगितलं

विजय वडेट्टीवारांबाबत 'त्या' शब्दामुळे चूक झाली : अजित पवार
Follow us
| Updated on: Jan 09, 2020 | 10:53 AM

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार दुय्यम दर्जाची खाती दिल्याने नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशातच वडेट्टीवारांना मिळालेल्या खात्याच्या नावातील एका शब्दामुळे घोळ झाला, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar on Vijay Wadettiwar) केला.

विजय वडेट्टीवारांची एक चूक झालेली आहे. ती काय झाली, तर ‘मदत पुनर्वसन’ खातं वडेट्टीवारांना देण्यात आलं होतं. ते काँग्रेसने दिलं होतं. मात्र त्यात ‘मदत पुनर्वसन’ ऐवजी ‘भूकंप पुनर्वसन’ असं झालं. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण करेक्शन करुन देऊ, असं सांगितलं. म्हणजेच मदत पुनर्वसन करुन देण्याची ग्वाही दिली. त्यामुळे तशी काही नाराजी नाही, असं अजित पवार म्हणाले.

विजय वडेट्टीवार यांच्या नाकदुऱ्या काढण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिलेला ‘ब 1’ बंगला देऊन विजय वडेट्टीवार यांची समजूत काढण्यात आली. मात्र तरीही वडेट्टीवारांची नाराजी कायम आहे.

विजय वडेट्टीवारांना ओबीसी, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, ‘भूकंप पुनर्वसन’ या खात्यांचं कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. मात्र मंत्रिमंडळातील ही दुय्यम खाती मिळाल्यामुळे विजय वडेट्टीवार नाराज असल्याची चर्चा आहे.

वडेट्टीवारांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या पहिल्या बैठकीला दांडी मारली होती. पदभारही न स्वीकारल्यामुळे त्यांची नाराजी दिसून आली होती. वडेट्टीवार आग्रही असलेला बंगलाही आव्हाडांच्या वाट्याला गेल्यामुळे नाराजीत भर पडली होती.

विजय वडेट्टीवार यांना अखेर मर्जीतला ‘ब 1’ बंगला बहाल करण्यात आला. तर जितेंद्र आव्हाड यांना आता ‘ब 1’ ऐवजी ‘ब 5’ बंगल्याचं वाटप केलं जाणार आहे. वडेट्टीवारांची समजूत घालण्यासाठी काय कसरत करावी लागते, हा प्रश्न महाविकास आघाडीतील वरिष्ठांना पडला आहे.

विजय वडेट्टीवार भाजपात आलेच तर त्यांचे स्वागत आहे. वडेट्टीवार यांच्यावर अन्याय झाला आहे, असं भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. त्यामुळे वडेट्टीवार काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Ajit Pawar on Vijay Wadettiwar

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.