खासदारकीला सुप्रिया सुळे, विधानसभेला दादा; बारामतीकरांचं म्हणणं काय ?

लोकसभा निवडणुकीचं रणशिंग येत्या काही काळातचं फुंकलं जाईल. अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणूका आल्या असून सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. बारामतीमध्ये पवार कुटुंबाचा बोलबाला असून काल बूथ कमिटी मेळाव्यात संबोधित करताना अजित पवारांनी मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला.

खासदारकीला सुप्रिया सुळे, विधानसभेला दादा; बारामतीकरांचं म्हणणं काय ?
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 2:53 PM

बारामती | 17 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणुकीचं रणशिंग येत्या काही काळातचं फुंकलं जाईल. अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणूका आल्या असून सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. बारामतीमध्ये पवार कुटुंबाचा बोलबाला असून काल बूथ कमिटी मेळाव्यात संबोधित करताना अजित पवारांनी मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. तर आज शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना आम्ही भावनात्मक अपील करणार नाही, कारण बारामतीचे लोक आम्हाला वर्षानुवर्ष ओळखतात, असं स्पष्ट केलं. या सर्वांबद्दल बारामतीकरांना काय वाटतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

बारामती आणि पवार कुटुंब यांचं जुनं नातं आहे. पवार कुटुंबाचा तो कित्येक वर्षांचा मतदार संघ आहे. पण आता राष्ट्रवादीत फूट पडली आणि शरद पवरा गट व अजित पवार गट असे दोन वेगळे ग्रुप झाले. याबद्दल बारामतीच्या मतदारांना काय वाटतं ? बारामतीकरांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

खासदारकीला सुप्रिया सुळे तर विधानसभेला दादा पाहिजेत, असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर काही लोकांना ते दोघंही चांगले वाटतात. पण उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या सूर्याला विसरायचं नसतं असं काहीचं म्हणणं आहे. या मतदारसंघातील युवकांच्या मनात मात्र अजित पवार आहेत. आम्ही दादांच्या रुपात मुख्यमंत्री पाहतो असं काही तरूणांचा म्हणणं आहे. एकंदरच दोन्ही पवार गटाकडेही बारामतीकरांचा कल आहे. पण अंतिम निवडणुकीत ते कोणाला कौल देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल.

अजित पवार यांचा रायगड दौरा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रायगड दौरा आयोजित करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा पाभरे फाटा परिसरात शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्प कामाचे भूमिपूजन सोहळा असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीर मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले असून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात येत आहे. मेळाव्या ठिकाणी भव्य मोठे स्टेज बांधून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बसण्यासाठी मोठ्या प्रमाणात आसन व्यवस्था करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह , खासदार सुनील तटकरे , मंत्री आदितीताई तटकरे , आमदार अनिकेत तटकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहतील.

‘ माझ्या बाकीच्या परिवाराने मला एकट पाडलं तर बारामतीकरांनी मला एकटा पाडू नये’ अशी विनंती अजितदादा यांनी काल करत बारामतीकरांना भावनिक साद घातली होती. मात्र या नंतर मी पाच वेगवेगळ्या चिन्हावर लढलो कार्यकर्तानो लोकांमध्ये जा यश मिळणार असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त करत अजित पवार यांच्यावर टीका देखील केली . मात्र या मेळाव्यात नेमकं आता अजित दादा शरद पवार यांना काय उत्तर देणार व कार्यकर्त्यांना कुठला कान मंत्र देणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.