Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांच्या खात्यात 15 लाख आले का? अजित पवारांचा मोदी सरकारला सवाल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 लाख रुपये आलेले नाहीत. ते आले असते तर शेतकरी सुखी झाले असते, असं म्हटलंय. (Ajit Pawar Narendra Modi)

शेतकऱ्यांच्या खात्यात 15 लाख आले का? अजित पवारांचा मोदी सरकारला सवाल
अजित पवार, मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 7:03 PM

अमरावती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 लाख रुपये आलेले नाहीत. ते आले असते तर शेतकरी सुखी झाले असते, असा टोला मोदी सरकारला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख 15 कोटी रुपये पाठवल्याचं सांगितलं होते. त्यावर बोलताना अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन दिली आहे. अजित पवार अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते. (Ajit Pawar raised question on Narendra Modi 2014 election promise of 15 lakh rupees )

अजित पवार काय म्हणाले?

आता पर्यंत 1 लाख 15 हाजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी सांगितलय.पण अजून पर्यंत लोकांच्या खात्यात 15 लाख आले नाही. मोठ्या लोकांनी असे काही वक्तव्य केल्यावर बाकी लोकांना वाटते की पैसे आले. जर 15 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आले असते तर शेतकरी समाधाही झाला असता, असं वक्तव्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावतीमध्ये केले.

आज शेतकरी समाधानी दिसतो का? शेतकरी आज संकटात आहे. अडलेल्या नडलेल्या परिस्थीत तो जीवन जगतोय. मात्र, त्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळणं हा त्यांचा हक्क आहे, असंही अजित पवार म्हणाले. शरद पवार यांचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी 50 ते 60 वर्षांचा संबंध आहे. त्यांनी कायम गरिबांची बाजू घेतली आहे, असंही अजित पवार म्हणाले.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत बोलताना त्यांच्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला. 2014 नंतर काही परिवर्तन केले, पीक विमा योजना वाढवली, जेणेकरुन छोटे शेतकरी त्याचा फायदा घेऊ शकतील, गेल्या चार -पाच वर्षात पीक विमा योजनेअंतर्गत 90 हजार कोटी रुपयांचा क्लेम शेतकऱ्यांना मिळाला. ही रक्कम कर्जमाफीपेक्षा मोठी होते, असं नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पाठवली. दहा कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. बंगालचे शेतकरी जर यात जोडले गेले असते तर हा आकडा मोठा असता. आतापर्यंत 1 लाख 15 हजार कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगतिलं. 10 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ दिला. बंगालचं राजकारण आडवं आलं नसतं तर हा आकडा मोठा असता, छोट्या शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना आणली, आम्ही पहिल्यांदाच किसान रेल्वे आणली, याचा फायदा छोट्या शेतकऱ्यांना झाल्याचा दावा मोदींनी केला.

संबंधित बातम्या:

रावसाहेब दानवेंचं वक्तव्य तथ्यहीन, केंद्रानं हटवादी भूमिका सोडावी- अजित पवार

“ग्रामपंचायतीला दोन गट उभे राहतात; निवडून येतो, तो म्हणतो दादा आम्ही तुमचे” अजितदादांनी हशा पिकवला

(Ajit Pawar raised question on Narendra Modi 2014 election promise of 15 lakh rupees )

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.