VIDEO: यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’चा उल्लेख, अजितदादा म्हणाले…
शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर विभागाला एक डायरी सापडली आहे. त्यात मातोश्रीला 2 कोटी रुपये दिल्याचा उल्लेख आहे.
रत्नागिरी: शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव (yashwant jadhav) यांच्याकडे आयकर विभागाला एक डायरी सापडली आहे. त्यात मातोश्रीला (matoshree) 2 कोटी रुपये दिल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या डायरीवरून विरोधकांनी महाविकास आघाडीला (mahavikas aghadi) कोंडीत पकडलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एजन्सी त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. अशा चौकशा होत असतात. यशवंत जाधव यांनीच याबाबत उत्तर दिलं आहे. मी माझ्या आईला मातोश्री म्हणतो, असं त्यांनी सांगितलं. काही लोकं आपल्या आईला मातोश्री म्हणतात. म्हणतात ना की नाही म्हणत? ते स्वत: म्हणतात त्याला पुन्हा पुन्हा का अधिक उकळी देण्याचं काम करता, असंही अजितदादाद म्हणाले.
अजित पवार हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हानियोजनाच्या बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर मीडियाशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुजय विखेंना चांगलंच फटकारलं. ज्यांना कुणाला उद्योग नाही ते टीका टिप्पणी करतात. माझी पत्रकारांना विनंती आहे की, असल्या गोष्टींना जास्तीचं महत्त्व देण्यापेक्षा उलट तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. मी इथे येऊन तिथल्या तिथे एवढे झटझट निर्णय घेतले. ताबडतोब तीन ते चार सचिवांशी बोलून त्यांना सूचना दिल्या आहेत. त्याला महत्त्व द्या ना, असं अजित पवार म्हणाले. ज्यांना उद्योग नाही त्यांनी आमच्यावर टीका करायची आणि आम्ही त्याला उत्तर द्यायचं. पुन्हा तुम्ही त्यांच्याकडे जायचं, अजित पवार असं म्हणाले, त्याला तुमचं उत्तर काय असं विचारायचं. यातून तुम्ही काय साधणार आहात? आणि मी काय साधणार आहे? राज्यातील जनता काय साधणार आहे? याचाही विचार करा ना, असंही अजित पवार म्हणाले.
ठाकरेंची भूमिका महत्त्वाची
ज्यांनी केलेल्या स्टेटमेंटला गांभीर्याने घेण्याची गरज आहे अशा स्टेटमेंटबद्दल आम्ही उत्तर देऊ. त्यांच्या स्टेमेंटला फार काही महत्त्व द्यायची गरज नाही, अशा शब्दात अजितदादांनी विखेंना फटकारलं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही सरकार चालवत आहोत. ठाकरे साहेबांची भूमिका महत्त्वाची आहे. आम्ही त्यांना साथ देत आहोत, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
संबधित बातम्या:
ऑडिओ क्लीप व्हायरल करून नाशिकमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; कर्जबाजारीपणामुळे टोकाचे पाऊल