Ajit Pawar : शरद पवारांच्या ‘त्या’ निर्णयानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले अजित दादा ?

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली. या निर्णयानंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान या निर्णयानंतर अजित पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar : शरद पवारांच्या 'त्या' निर्णयानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले अजित दादा ?
काय म्हणाले अजित पवार ?
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 5:17 PM

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या दोन नेत्यांची नियुक्ती केली आहे. मात्र अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी देण्यात आलेली नाही. यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते. दरम्यान या घोषणेनंतर माध्यमांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अजित पवार यांनी माध्यमांशी कुठलाही संवाद न साधता तेथून निघून गेले. त्यामुळे ते नाराज असल्याचीही चर्चा रंगली. अखेर याप्रकरणी अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

अजित पवारांचे ट्विट

माध्यमांशी काहीच न बोलता निघून गेलेल्या अजित पवारांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. पवार साहेबांनी टाकलेला विश्वास सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे, असे अजित पवार यांनी लिहीले आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे.’ असे अजित पवार यांनी लिहील आहे.

‘ आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…’ हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन! ‘ असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने दिल्लीत राष्ट्रवादीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यानंतर शरद पवार यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. शरद पवार यांच्या या घोषणा म्हणजे धक्कातंत्राचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. शरद पवार यांनी पक्षात भाकरी फिरवली. पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा केली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी देण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

अजित पवारांकडे काहीच नाही

पवार यांनी सध्या अजित पवार यांच्याकडे काहीच जबाबदारी दिली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अजित पवार यांना साईडलाईन केलंय का? अशी चर्चाही रंगली आहे. सुप्रिया सुळे दिल्लीत आणि अजित पवार महाराष्ट्रात अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती. मात्र, पवार यांनी सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करतानाच महाराष्ट्रातील निवडणुकांची जबाबदारीही त्यांच्याकडे दिली आहे. अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्राच्या निवडणुकांची जबाबदारी दिलेली नाहीये. पवारांच्या या खेळीमुळे सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.