सकाळी 7 ते 11 भाजी मार्केट सुरु, एकट्यानेच जा, संचारबंदी मोडणाऱ्यांना अजित पवारांची तंबी

नागपूरमध्ये पोलिस कडक संचारबंदी पाळण्यासाठी काम करत आहेत. मुंबईतही तशीच संचारबंदी दिसायला हवी, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या.(Ajit Pawar warns Curfew Violators)

सकाळी 7 ते 11 भाजी मार्केट सुरु, एकट्यानेच जा, संचारबंदी मोडणाऱ्यांना अजित पवारांची तंबी
Follow us
| Updated on: Mar 24, 2020 | 2:35 PM

मुंबई : संचारबंदीसारखे निर्णय राज्य सरकारने जनतेच्या हितासाठीच घेतले आहेत. यात कुणाचा वैयक्तिक स्वार्थ असण्याचं काही कारण नाही. आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. सकाळी 7 ते 11 भाजी मार्केट सुरु राहणार आहे, मात्र एकट्यानेच जा, अशी तंबीही अजितदादांनी दिली. (Ajit Pawar warns Curfew Violators)

कृपया घरीच रहा, अशी विनंती करतो. अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. भाजीपाला मिळेल परंतु त्याठिकाणी गर्दी करु नका. सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत भाजी मार्केट सुरु ठेवण्यास सांगण्यात आलेलं आहे. तेवढ्या वेळेतच लोकांनी भाजी खरेदी करावी आणि आपापल्या घरी जावे, असं अजित पवार म्हणाले.

व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याबरोबर मी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे मुख्य सचिव यांनी चर्चा केली. राज्यात व्हेंटीलेटरचा तुटवडा जाणवणार नाही याबाबतची काळजी घेण्यात येईल, अशी हमी अजित पवारांनी दिली.

(Ajit Pawar warns Curfew Violators)

कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. राज्यात आता हा आकडा 101 वर गेला आहे. कालच साताऱ्यात एक जण आढळला. नागपूरमध्ये पोलिस कडक संचारबंदी पाळण्यासाठी काम करत आहेत. मुंबईतही तशीच संचारबंदी दिसायला हवी, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या.

सुशिक्षित नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. बाजारात जाताना एकट्याने जावे. कारण नसताना बाहेर पडाल तर पोलिस कारवाई करतील, असा इशाराही त्यांनी दिला. मास्क किंवा औषधांची अवैध साठेबाजी करणाऱ्या असामाजिक घटकांवर कठोर कारवाई केली जाईल, असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

‘कोरोनो’च्या पार्श्वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा, कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये, गर्दी टाळावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. देशावरचा ‘कोरोना’चा धोका पूर्णपणे संपल्यानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी या गुढीपाडव्याचा उत्साह राखून ठेवावा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. (Ajit Pawar warns Curfew Violators)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.