जेव्हा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार धरतात खरदीचे पैसे देण्याचा हट्ट, नंतर काय घडलं…

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पैसे देण्याचा हट्ट का धरला ? सुनेत्रा पवारांची होऊ लागली चर्चा.

जेव्हा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार धरतात खरदीचे पैसे देण्याचा हट्ट, नंतर काय घडलं...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 3:48 PM

अभिजीत पोते, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी, पुणे : नेते, मंत्री किंवा पदाधिकारी हे अनेकदा सामाजिक जीवनात वावरत असतांना खरेदी (Shopping News) करतांना दिसत नाही. तशी त्यांच्याकडे यंत्रणा कार्यरतच असते. अनेक कार्यकर्ते, नोकर यांच्याकडूनच तशी कामे करून घेतली जातात. पण, असे काही प्रसंग असतात की तिथे पैसे देण्याची वेळ येते. तेव्हा जवळ असलेल्या जवळच्या व्यक्तिकडून पैसे घेतले जातात. मग कुठे दान धर्म असो, ओवाळणी असो किंवा दक्षिणा द्यायची असो. तसा गणेशोत्सवात अजित दादांनी (Ajit Pawar) सोबतच्या व्यक्तिकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ समोर आलाच होता. पण त्यांच्या पत्नीने याबाबत स्वतःच पैसे देण्याचा हट्ट धरल्याचे समोर आले आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या पुण्यातील यशश्री सखी समूहाच्या दिवाळी वस्तूंच्या प्रदर्शन आणि विक्रीच्या उद्घाटनाला आल्या होत्या.

उद्घाटनानंतर सुनेत्रा पवार या प्रदर्शनाची पाहणी करत असताना त्यांना एक पूजेची वस्तू आवडली आणि त्यांनी ती घेतली सुद्धा.

यात आरतीचा काचेचा सेट आणि काचेचे दोन दिवे यांचा समावेश होता. त्यांनी त्यांच्यासोबत असणाऱ्यांना ते घ्या असे सांगितले. आणि लगेच त्यांचा स्टॉल होता त्यांना पैसे किती झाले असे विचारले.

हे सुद्धा वाचा

पण तिथल्या स्थानिक नगरसेवकांनी आणि स्टॉल वाल्यांनी ताई पैसे नको असं सांगितलं. पण त्यांच्या या विधानाला सुनेत्रा पवार यांनी लगेच नकार दिला.

जर तुम्ही पैसे घेतले तरच मी हा सेट खरेदी करेल असा हट्ट धरला. आणि त्यांनी त्या वस्तूची पूर्ण किंमत देऊनच ती वस्तू खरेदी केली.

अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पैसे देण्याचा हट्ट आणि पैसे देण्यासाठी ठेवलेली अट पाहून चर्चेचा विषय ठरत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.