अजित पवांरांच्या ‘त्या’ दाव्यामुळे महाविकासआघाडीमध्ये ठिणगी? नाना पटोलेही संतापले!

नाशिकच्या पदवीधर निवडणुकीत अपक्ष सत्यजित तांबेंचा विजय झाला. मात्र यावरुन अजित पवारांनी जे काही वक्तव्य केलं. त्यावरुन अजित पवार आणि नाना पटोले आमनेसामने आलेत.

अजित पवांरांच्या 'त्या' दाव्यामुळे महाविकासआघाडीमध्ये ठिणगी? नाना पटोलेही संतापले!
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 11:41 PM

मुंबई : नाशिकच्या पदवीधर निवडणुकीत अपक्ष सत्यजित तांबेंचा विजय झाला. मात्र यावरुन अजित पवारांनी जे काही वक्तव्य केलं. त्यावरुन अजित पवार आणि नाना पटोले आमनेसामने आलेत. सत्यजित तांबेंना महाविकास आघाडीची मतं मिळाल्याचं दिसतंय, असं अजित पवार म्हणालेत. त्यावरुन अजित पवार आणि पटोले आमनेसामने आलेत.

अजित पवारांची सत्यजित तांबेंवरची ही प्रतिक्रिया चकीत करणारी आणि नाना पटोलेंचा संताप वाढवणारी आहे. नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत सत्यजित तांबेंना महाविकास आघाडीनं मदत केल्याचं दिसतंय, असं अजित पवार म्हणालेत. त्यावरुन राष्ट्रवादीनंच मदत केल्याचं अजित पवारांनी कबूल केल्याचा पलटवार पटोलेंनी केलाय. नाशिक पदवीधरचा निकाल पाहिला तर अपक्ष सत्यजित तांबेंना 68 हजार 999 मतं मिळालीत तर महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटलांना 39 हजार 534 मतं मिळाली. तब्बल 29 हजार 465 मतांनी सत्यजित तांबेंचा विजय झाला.

शुभांगी पाटलांच्या मागे, ठाकरे गट-काँग्रेस आणि राष्ट्रवादी होती तर सत्यजित तांबे अपक्ष मैदानात होते. अर्थात भाजपच्या नेत्यांच्या बोलण्यावरुन हेही स्पष्ट झालं की भाजपनंही तांबेंना मदत केलीच पण त्याचवेळी मविआचीही मतं मिळाली असावीत असं अजित पवारांना वाटतंय. सत्यजित तांबे आमदार तर झालेत आता प्रश्न हा आहे की, सत्यजित तांबे काँग्रेसमध्ये परतणार का? सत्यजित तांबेंना काँग्रेसबद्दल अजूनही आपुलकी आहे हे तर त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसतेच आहे.

सत्यजित तांबे शनिवारी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत त्यांच्या बोलण्यातून ते काँग्रेसमध्येच जातील असं दिसतंय तर स्वत: पटोलेंनीही पॉझिटिव्ह संकेत दिलेत. नाशिकमध्ये काँग्रेसनं आपली उमेदवार डॉ. सुधीर तांबेंना दिली होती..पण ऐनवेळी पुत्र सत्यजित तांबेंनी फॉर्म भरला आणि खळबळ उडाली तर सत्यजित तांबेंसाठी शरद पवारांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना फोन केला होता, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला तर सत्यजित तांबेंनी काँग्रेसकडे तिकीटच मागितलं नव्हतं, असं पटोले म्हणाले म्हणतायत.

पटोले ज्या परिवारातल्या भांडणाबद्दल बोलत आहेत, तो परिवारवाद सत्यजित तांबे आणि त्यांचे मामा तसंच काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरातांमधला आहे. थोरातांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्यानं ते माध्यमांपासून दूर असल्याचं सांगितलं जातंय..मात्र आतापर्यंत कुठली प्रेस नोट काढूनही किंवा ट्विटरवरुनही त्यांनी सत्यजित तांबेंबद्दल एक वाक्यही उद्गारलेलं नाही पण या तिकीटाच्या वादात विजय तर सत्यजित तांबेंचाच झालाय. आता ते काँग्रेसचाच हात हातात घेतात का? हे पुढच्या काही तासांत स्पष्ट होईल.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.