भाजपच्या नाराजीनंतरही अजितदादा मलिकांच्या प्रचारात आघाडीवर, म्हणाले कोणीही कितीही विरोध करू द्या तरीही..

भाजपच्या विरोधानंतर देखील आज अजित पवार नवाब मलिक यांचा प्रचार करताना दिसले, दरम्यान यावर आता अजितदादा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भाजपच्या नाराजीनंतरही अजितदादा मलिकांच्या प्रचारात आघाडीवर, म्हणाले कोणीही कितीही विरोध करू द्या तरीही..
अजित पवार
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 7:19 PM

निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचाराला वेग आला आहे. यंदाची लढत महाविकास आघाडीविरोधात महायुती अशीच होणार आहे. दरम्यान भाजपकडून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला होता. आम्ही नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका भाजप नेते आशिष शेलार यांनी घेतली होती. तर त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी देखील नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून अजित पवार यांना एक पत्र लिहिलं होतं, या पत्रात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. भाजपच्या विरोधानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना उमेदवारी मिळणार का याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

मात्र अजित पवार यांनी भाजपचा विरोध डावलून नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगर येथून तर नवाब मलिक यांना मानकूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. एवढंच नव्हे तर आज अजित पवार हे नवाब मलिक यांचा जाहीररित्या प्रचार करताना देखील दिसून आले.

यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी माझे उमेदवार दिले आहेत, माझं कर्तव्य आहे त्यांच्या प्रचाराला किंवा सभेला जाणं. यादृष्टीने मी प्रचाराला आलो आहे.  कोणी किती पण आरोप करू द्या ते आरोप सिद्ध झाले नाहीत, ते केवळ आरोप राहिलेत आहेत.  अशी किती जणांची नावे सांगू त्यांच्यावर आरोप केले. तसेच मलिकांवर देखील आरोप केले माझ्यावर देखील अशाच पद्धतीने आरोप केले होते, परंतु सिद्ध झाले का? आम्ही उमेदवार देताना प्रत्येक गोष्टीचा विचार केलाय कोणत्याही समाजाला दुर्लक्षित केलेल नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

भजपचा मलिकांना विरोध

दरम्यान भाजपकडून मलिक याच्या उमेदवारीला सुरुवातीपासून विरोध करण्यात येत आहे. आम्ही मलिक यांचा प्रचार करणार नाहीत, अशी भूमिका भाजपनं घेतली आहे. मात्र तरी देखील अजित पवार यांनी भाजपचा विरोध डावलून मलिक यांना उमेदवारी दिली आहे.

Non Stop LIVE Update
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?.
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?.
भुजबळांचा खळबळजनक दावा, 'ईडीपासून सुटका माझ्यासाठी पुनर्जन्मच अन्...'
भुजबळांचा खळबळजनक दावा, 'ईडीपासून सुटका माझ्यासाठी पुनर्जन्मच अन्...'.
पक्ष-चिन्हाच्या मालकीवरुन राज ठाकरेंच्या टार्गेटवर शिंदे अन् अजितदादा
पक्ष-चिन्हाच्या मालकीवरुन राज ठाकरेंच्या टार्गेटवर शिंदे अन् अजितदादा.
कुत्रा, टॉमी, बुलडॉग... खोतांची जीभ घसरल्यानंतर इतरांची भाषाही घसरली
कुत्रा, टॉमी, बुलडॉग... खोतांची जीभ घसरल्यानंतर इतरांची भाषाही घसरली.
शिंदे अन् ठाकरेंचे उमेदवारांमध्ये राडा, बार्शीतील राजकारण तापलं
शिंदे अन् ठाकरेंचे उमेदवारांमध्ये राडा, बार्शीतील राजकारण तापलं.
उद्धव ठाकरेंचा माझं कुटुंब, माझी जबाबदारीनुसार अमित ठाकरेंना पाठिंबा?
उद्धव ठाकरेंचा माझं कुटुंब, माझी जबाबदारीनुसार अमित ठाकरेंना पाठिंबा?.
मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती
मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती.
अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? काका-पुतण्या भिडले
अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? काका-पुतण्या भिडले.
राणांची यशोमती ठाकूरांवर टीका, 'माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या...'
राणांची यशोमती ठाकूरांवर टीका, 'माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या...'.