Ajit Pawar : जेवढा मोठा हार तेवढी भीती… वाटतं आयला याने कुठे तरी मारली; अजितदादांची मिश्किल टोलेबाजी
प्रवक्त्यांनी तोलून मापून बोलावं. कोणत्या समाजाला राग येईल असं काही बोलू नका असं ते म्हणाले. आम्हालाही दांडकं ( रिपोर्टर-बूम) घेऊन येतात आणि विचारतात दादा तुमचं काय म्हणणं आहे? पण मी उपमुख्यमंत्री असूनही माहिती घेतल्याशिवाय बोलत नाही, असं अजित पवार म्हणाले.

बीडच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युवा संवाद मेळाव्यात तरूण कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह अनेकांना मार्गदर्शन केलं. यावेळी झालेल्या भाषणात अजित दादांनी तूफान टोलेबाजी केली. कोठेही गेल्यावर लोकं, कार्यकर्ते, तेथील स्थानिक नेते वगैरे भेटायला येतात. मला जरीच्या शाल दिल्यावर त्यात कागद तसाच सतो, हार आणल्यावर पिशवी आणून तसाच ठेवतात. मला शाली आलू नका, टोप्या घालू नका ( हसतात) , हालही नको. नुसता नमस्कारही प्रेमाचा वाटेल. पण भला मोठा हार आणतात. जेवढा मोठा हार असतो, तो पाहून तेवढीच भीती वाटते अशी मिश्कील टिप्पणी अजित पवार यांनी केली. तो हार पाहून असं वाटतं की आयला याने कुठे तरी मारली (घोळ केला) आता ती कुठं मारली, काय मारली ते पाहा तुम्ही. त्यामुळे हाराचा बोझा आहे मानगुंटीवर,असा टोला अजित पवार यांनी हाणला.
प्रवक्त्यांनाही दिला सल्ला
यावेळी अजित पवार यांनी प्रवक्त्यांनाही सल्ला दिला. प्रवक्त्यांनी तोलून मापून बोलावं. कोणत्या समाजाला राग येईल असं काही बोलू नका असं ते म्हणाले. आम्हालाही दांडकं ( रिपोर्टर-बूम) घेऊन येतात आणि विचारतात दादा तुमचं काय म्हणणं आहे? पण मी उपमुख्यमंत्री असूनही माहिती घेतल्याशिवाय बोलत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. प्रत्येकाने निर्व्यसनी राहा. साधूसंत काय सांगतात ते आचरणात आणा,असा सल्ला अजित दादांनी दिला.
जवळचा कंत्राटदार असेल तरी कारवाई करणार
अजित पवारांनी चुकीची काम करणाऱ्यांनाही खडसावलं. काही ठिकाणी बेक्कार कामे चालू आहेत. माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत. मी स्क्वॉड पाठवून चेक करणार आहे. अजितदादाच्या जवळचा कंत्राटदार असेल तरी कारवाई करणार. काळ्या यादीत टाकणार,असा इशारा दादांनी दिला.
बीड जिल्ह्यातील लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहे. मी पुढच्यावेळी मुक्कासाठी येईन,बीडमधील प्रतिष्ठीत लोकांची बैठक घेणार आहे. त्यांच्या आमच्याकडच्या अपेक्षा काय आहे हे विचारणार आहे. काही काही भाग खूप पुढे गेले आहे पण आपल्याकडचा कचराही निघत नाही. कचराही साफ होत नाही, इतका विरोधाभास आहे. आपल्याला लोकांच्या मानसिकतेत बदल करायचा आहे असं अजित पवार म्हणाले. प्रतिष्ठीत लोकांचाही काही विचार असेल. त्यांना विश्वासात घेणार, त्यांचं काय व्हिजन आहे हे पाहणार. मी सर्व अधिकारी हजर ठेवेन,. मी जिथे जातो तिथे सर्व अधिकारी हजर ठेवतो. कारण तिथल्या तिथे निर्णय घ्यायला सोपं जातं, असं अजित दादांनी सांगितलं.