अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाआधी शरद पवारांची मोठी घोषणा, कार्यक्रमाची रुपरेषा ठरली

माझ्या अनेक बैठका रावळपिंडी आणि कराचीत बैठका व्हायच्या. कराचीत मुंबईतील लोक भेटायचे. १०० लोकांची महाराष्ट्र मंडळ नावाची संस्था आहे. कराचीत आहे. विशाल राजपूत हे मुख्य आहेत. सिंध प्रांतात एक हजार लोक राहतात, असेही शरद पवारांनी म्हटले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाआधी शरद पवारांची मोठी घोषणा, कार्यक्रमाची रुपरेषा ठरली
शरद पवार, नेते राष्ट्रवादीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Dec 19, 2024 | 2:43 PM

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : आगामी 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन यंदा राजधानी दिल्लीत पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. नुकतंच शरद पवारांनी संमेलनाची तयारी आणि याबद्दलची माहिती देण्यासाठी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. या संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत राहणार आहेत, अशी माहिती शरद पवारांनी दिली.

शरद पवारांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची रुपरेषा कशी असणार याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्रासह दिल्लीतील ५ हजार साहित्य प्रेमी उपस्थित राहणार आहेत. तर २५०० प्रतिनिधी महाराष्ट्रातून येणार आहेत, अशी माहिती शरद पवारांनी दिली.

मुख्य सभागृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केलं. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित करणार आहोत. मुख्य सभागृह त्याचं नामकरण केलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह असं नाव दिलं. लोकमान्य टिळक आणि यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने प्रवेशद्वार राहणार असेल. या साहित्य संमेलनाला दिल्ली आणि महाराष्ट्रातील ५ हजार साहित्य प्रेमी उपस्थित राहतील. त्याशिवाय २५०० प्रतिनिधी महाराष्ट्रातून येणार आहे. १५०० लोकांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता ग्रंथ दिंडी निघणार आहे”, असे शरद पवार म्हणाले.

मोदींची कार्यक्रमाला यायची इच्छा

“पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्ही आधीच निमंत्रण दिलं. त्यांच्या सचिवांचा फोन आला. वेळ कळवणार आहेत. सकाळी की दुपारी येणार हे सांगतील. त्यांना एक विनंती केली की, पंतप्रधानांचं निश्चित झालं तर आम्ही विद्या भवनात कार्यक्रम घेऊ. एक दोन दिवसात आम्हाला याबाबतची माहिती मिळेल. मोदींची कार्यक्रमाला यायची इच्छा आहे. सकाळीच हवी का? दुपारी आलेलं चालेल का? असा प्रश्न मोदींनी विचारला. त्यामुळे ते येणार असं आम्ही गृहित धरलं आहे. मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यांची संमती आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोललो नाही. त्यांना निमंत्रण देणार आहोत”, असेही शरद पवारांनी सांगितले.

साहित्य संमेलनाचा संबंध नाही

“पाकिस्तानातील मराठी भाषिकांनी साहित्य संमेलनाला यायची इच्छा व्यक्त केली आहे. पण हा प्रश्न सोपा नाही. परराष्ट्र मंत्रालयाशी बोलावं लागेल. सरकारचं कन्फर्मेशन मिळेल की नाही हे सांगू शकत नाही. साहित्य संमेलनाचा संबंध नाही. पण जगातील कित्येक संघटनाचा अध्यक्ष होतो. माझ्या अनेक बैठका रावळपिंडी आणि कराचीत बैठका व्हायच्या. कराचीत मुंबईतील लोक भेटायचे. १०० लोकांची महाराष्ट्र मंडळ नावाची संस्था आहे. कराचीत आहे. विशाल राजपूत हे मुख्य आहेत. सिंध प्रांतात एक हजार लोक राहतात”, असेही शरद पवारांनी म्हटले.

“अजून वक्त वाढतील. मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या नंतरचं हे दिल्लीतील पहिलं संमेलन आहे. शरद पवार यांचा साहित्याशी आधीपासूनचा संबंध आहे. त्यामुळे ते स्वागत अध्यक्ष होतील”, असेही शरद पवार म्हणाले

'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....