पेच मिटला, साहित्य संमेलनाचं उद्घाटन शेतकरी महिला करणार
यवतमाळ: यवतमाळमध्ये उद्या 11 जानेवारीपासून सुरु होत असलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा पेच अखेर मिटला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशाली सुधाकर येडे या साहित्य संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत. टीव्ही 9 मराठीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली. पतीच्या मृत्यूनंतर हिंमतीने उभा राहत, समाजाला वेगळी दिशा देणाऱ्या वैशाली येडे या साहित्य संमेलनाचं उद्घाटन […]
यवतमाळ: यवतमाळमध्ये उद्या 11 जानेवारीपासून सुरु होत असलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा पेच अखेर मिटला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशाली सुधाकर येडे या साहित्य संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत. टीव्ही 9 मराठीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली. पतीच्या मृत्यूनंतर हिंमतीने उभा राहत, समाजाला वेगळी दिशा देणाऱ्या वैशाली येडे या साहित्य संमेलनाचं उद्घाटन करणार आहे. यवतमाळमध्ये 11 ते 13 जानेवारीदरम्यान 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे.
कोण आहेत वैशाली सुधारकर येडे?
वैशाली सुधाकर येडे यांच्या हस्ते 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. वैशाल येडे या यवतमाळमधील राजुर तालुक्यातील कळंब येथील आहेत. वैशाली येडे यांना दोन मुलं आहेत. तीन एकर जमिनीवर शेती आणि अंगणवाडी मदतनीस म्हणून काम त्या करतात.
‘तेरव’ नावाच्या नाटकाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्याच्या विरोधात वैशाल येडे काम करतात. आपल्या वाट्याला आलेला संघर्ष इतर कोणाच्या वाट्याला येऊ नये, यासाठी वैशाली सुधाकर येडे यांचं मोठं काम आहे.
साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सामान्य महिलेला हा मान मिळाला असून, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला साहित्य संमेलन उद्घाटनाचा मान देण्यात आला आहे.
काल श्रीपाद जोशींचाही राजीनामा
आधी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर, काल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनीच राजीनामा दिला. श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा ई मेलद्वारे दिला. विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर त्यांनी हा राजीनामा पाठवला. यात त्यांनी सहकार्याबद्दल साहित्य संघाचे आभारही मानले. थेट अध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे मोठा पेच निर्माण झाला.
नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यांतर संमेलनाचं उद्घाटन कोण करणार, याबाबतची उत्सुकता होती. त्यासाठी महामंडळाने तीन जणांना गळ घातली होती. मात्र त्यांनीही त्याला नकार दिला होता. शिवाय अनेक मराठी लेखकांनी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली.
अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा
वाद काय आहे?
भारतातील प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल या यवतमाळ येथे आयोजित 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक होत्या. मात्र, ऐनवेळी मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर महामंडळाच्या अध्यक्षांनी परस्पर सहगल यांना येण्यास नकार कळवला. नयनतारा यांच्यासारख्या प्रख्यात लेखिकेला आधी निमंत्रण दिलं, नंतर नकार कळवला, यामुळे साहित्यविश्वात एकच संतापाची लाट पसरली आहे. कुठल्यातरी गावगुंडांच्या सांगण्यावरुन प्रख्यात लेखिकेचा अपमान केला जातो, याबद्दल राग व्यक्त करण्यात येत आहे.
त्यातच, आता विविध व्याख्यानं, मुलाखती, कवीकट्टा इत्यादी कार्यक्रमांमधूनही सहभागी मान्यवरांनी साहित्य महामंडळाचा निषेध म्हणून माघार घेतली आहे. अनेक दिग्गज साहित्यिकांनी मराठी साहित्य महामंडळावर सडकून टीका केली आहे. आसाराम लोमटे, बालाजी सुतार, नामदेव कोळी, आशुतोष जावडेकर, मंगेश काळे इत्यादी लेखक, साहित्यिक, कवी, व्याख्यात्यांनी आयोजकांचा निषेध नोंदवून सहभागी होण्यास नकार कळवला आणि सहगल यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साहित्य महामंडळाचे पाय आणखीच खोलात रुतले आहेत. आता यावर उपाय काय, असा प्रश्न आ वासून साहित्य महामंडळासमोर आहे.
दरम्यान, नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्याबाबत अद्याप 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा अरुणा ढेरे यांची सविस्तर प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, तत्पूर्वी आयोजकांनी उद्घटाक म्हणून नव्या तीन नावांची चर्चा सुरु केली आहे.
महामंडळाच्या अध्यक्षांचा राजीनामा
92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी नाट्यमय घडामोडी घडत होत्या. आधी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर, आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनीच राजीनामा दिला .
संबंधित बातम्या
अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा
साहित्य संमेलन : उद्घाटक म्हणून ‘या’ तीन नावांची शिफारस