अकोला मध्यवर्ती बसस्थानकात रोगराईची भीती, प्रवाशांना कीटक व शिदोडयुक्त दूषित पाणी!

कोल्याच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाण्याच्या टाकीतून प्रवाशांना किटकयुक्त पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे बसस्थानक आणि आगार व्यवस्थापक प्रवाशांना दूषित पाणी प्यायला लावून एकप्रकारे आजारांना निमंत्रणच देत असल्याचा आरोप होत आहे.

अकोला मध्यवर्ती बसस्थानकात रोगराईची भीती, प्रवाशांना कीटक व शिदोडयुक्त दूषित पाणी!
अकोल्यातील मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांना दूषित पाणी पुरवठा
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 7:58 PM

अकोला : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. त्याबाबत जनजागृती करणारे अनेक पोस्टर्स तुम्ही एसटी बसवरही पाहत असाल. मात्र, एसटी महामंडळालाच याचा विसर पडल्याचं दिसून येत आहे. कारण, अकोल्याच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाण्याच्या टाकीतून प्रवाशांना किटकयुक्त पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे बसस्थानक आणि आगार व्यवस्थापक प्रवाशांना दूषित पाणी प्यायला लावून एकप्रकारे आजारांना निमंत्रणच देत असल्याचा आरोप होत आहे. (Algae and dirt in the water tank at the central bus station in Akola)

एसटी महामंडळाच्या अकोला विभागातील सर्वात मोठं मध्यवर्ती बसस्थानक अर्थात आगार क्र. 2 हे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे समस्यांचं माहेरघर बनलं आहे. अस्वच्छ गाड्यातून प्रवासी वाहतूक, खटारा आणि गळक्या बसेस, बसस्थानक परिसरातील निवाऱ्यात भिकाऱ्यांसह कुत्रे आणि मोकाट जनावरांचा मुक्त संचार, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुविधांचा मोठा अभाव अशी समस्यांची मालिकाच या बसस्थानकात पाहायला मिळत आहे. कोरोना आणि साथरोगाच्या काळात प्रवाशांच्या आरोग्याला प्राधान्य देत स्वच्छतेसह इतर कामांना प्राथमिकता देण्याचे शासन निर्देश आहेत. असं असतानाही आगार व बसस्थानक व्यवस्थापन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचंच पाहायला मिळत आहे.

पाण्याच्या टाकीजवळ शेवाळ, नळातून शिदोड बाहेर!

आगार व्यवस्थापकासह एसटीचे अधिकारी आपल्या कामाच्या वेळेत सातत्याने गैरहजर राहत असल्याच्याही तक्रारी आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे बसस्थानकातील समस्या वाढल्या आहेत. पाण्याच्या टाकी खालील नळाजवळ मोठ्या प्रमाणात शेवाळ जमा झालं आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. याबाबत प्रवाशांनी अनेकदा तक्रारी करुनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. महत्वाची बाब म्हणजे मध्यवर्ती बसस्थानकात चौकशी कक्षाला लागूनच ही पाण्याची टाकी आहे. असं असूनही या टाकीची स्वच्छता नियमितपणे केली जात नाही.

‘प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घ्या’

पाण्याच्या टाकीची स्वच्छता केली जात नसल्यामुळे पाणी प्यायला गेल्यास नळामधून शिदोड बाहेर येत आहेत. काही प्रवाशांनी पाण्याच्या अस्वच्छ टाकीचे आणि नळाचे फोटो, व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. आतातरी बसस्थानक आणि आगार व्यवस्थापकांनी प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेत स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जात आहे.

इतर बातम्या :

पीक विम्याबाबत राज्य सरकारचं केंद्राला पत्र; शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या, ‘सह्याद्री’वरील बैठकीत शरद पवारांची सूचना

राज्याच्या पर्यटन विकासासाठी 250 कोटींचा निधी, प्रायोगिक तत्वावर 10 जिल्ह्यात ‘जिल्हा पर्यटन अधिकारी’

Algae and dirt in the water tank at the central bus station in Akola

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.