नरेंद्र मोदींनी दखल घेतलेलं अकोल्याचं मराठा हॉटेल पुन्हा चर्चेत, वाचा नेमकं कारण काय?
मराठा हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न मोफतमध्ये लावून देण्याचा संकल्प केला आहे. Maratha Hotel Muralidhar Raut

अकोला: एखाद्या शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्याने आत्महत्या केली गेली त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. त्या परिस्थितीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक संकटातून जावे लागत लागते. आपणही त्या कुटुंबाचा एक भाग आहोत ही भावना घेऊन त्यांना साथ देण्याचा संकल्प मुरलीधर राऊत यांनी केला. अकोला जिल्ह्यातील नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील मराठा हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न मोफतमध्ये लावून देण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये त्यांना साथ लाभली ती जामोदे यांचे मंडप डेकोरेशन व फोटोग्राफर महेश आंबेकर यांची मदत मिळाली. कुणी हॉटेलच्या जेवणाचा खर्च उचलला तर कोणी बिछायत मोफत मध्ये दिली तर फोटोग्राफरने व्हिडीओ व फोटोग्राफी मोफत मध्ये करून देऊन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला थोडा आधार दिला आहे. ( Akola Maratha Hotel owner Muralidhar Raut started free marriage of son and daughters of farmers who committed suicide)
22 कुटुंबांना मदत
अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्यातील मराठा हॉटेलमध्ये आतापर्यंत 22 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न व्यवस्थेसह कोरोनाची पुरेशी काळजी घेऊन करण्यात आले आहे. अजूनही 40 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची नोंदणी झालेली असून दिलेल्या तारखेनुसार मुला मुलींचे लग्न लावून दिलं जाणार आहे. यामध्ये पाहुणे मंडळीचा संपूर्ण जेवणाचा खर्च हॉल बिछायत, यासह संपूर्ण खर्च हॉटेल संचालक करत असून शेतकरी कुटुंबाला कुठलाही खर्च येत नाही.
मुरलीधर राऊत यांच्या कामाची नरेंद्र मोदींकडून दखल
मराठा हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत नेहमीच सामाजिक दायित्व निभावत आले आहेत. नोटबंदीच्या काळामध्ये राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे पैसे नव्हते त्यांनाही मुरलीधर राऊत यांच्या मराठा हॉटेल मध्ये यांनी जेवण करून घ्या पैसे परत येताना द्या हा उपक्रम चालवला होता. या उपक्रमाचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी स्वतः मन की बात मधून कौतुक केले होते.
मुरलीधर राऊत हे नेहमीच सामाजिक जाणीव जपत कार्य करत असून आता कोरोनाच्या संकट काळात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींचे लग्न लावून देण्याची घेतलेली जबाबदारी अनेकांसाठी आदर्शवत आहे.
उपक्रमाला कशी सुरुवात झाली?
सात वर्षांपूर्वी विशाल प्रल्हाद काटे या शेतकऱ्याने शेतमजूर आणि मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह केला. मात्र कर्जापायी आत्महत्या केली आणि काटे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. एक मुलगा आणि एक मुलगी असणाऱ्या या शेतमजूर कुटुंबात आर्थिक संकटात असताना पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या काटे कुटुंबातील मुलीचे लग्न मराठा हॉटेलने सामाजिक जाणीव म्हणून लावून देत आजच्या युगातील खरा विचार मांडला आहे.
मराठा हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत हे स्वतः शेतकरी असून शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांना साथ दिली जावी या उद्देशाने सुरू झालेला हा संकल्प आज प्रेरणादायी संदेश देत आहे. आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला कुठलाही आधार नसताना मराठा हॉटेल चे संचालक यांनी पूर्ण केलेला संकल्प हा आम्हाला आपलेपणाची जाणीव करून देणारा असून मुरलीधर राऊत यांचे हे कार्य आम्ही कधीच विसरणार नाही अशी भावना या वेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्य सविता काटे यांनी व्यक्त केली.
संबंधित बातम्या
( Akola Maratha Hotel owner Muralidhar Raut started free marriage of son and daughters of farmers who committed suicide)