अक्षय शिंदे प्रकरणावरुन बदलापूरकर पुन्हा आक्रमक, कारण काय?

आता अक्षय शिंदेचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे. मात्र आता अक्षय शिंदेचे अंत्यसंस्कार बदलापुरात होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे.

अक्षय शिंदे प्रकरणावरुन बदलापूरकर पुन्हा आक्रमक, कारण काय?
akshay shindeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 3:55 PM

Akshay Shinde Encounter Case : बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागली आणि त्यानंतर अती रक्तस्त्राव झाला, असे त्याच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. यानंतर आता अक्षय शिंदेचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे. मात्र आता अक्षय शिंदेचे अंत्यसंस्कार बदलापुरात होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे.

बदलापूरकर पुन्हा आक्रमक

अक्षय शिंदेचे अंत्यसंस्कार बदलापुरातील मांजर्ली स्मशानभूमी परिसरात होणार आहेत. मात्र अक्षय शिंदेचे अंत्यसंस्कार बदलापुरात होऊ देणार नाही, अशा भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. ज्याने आमच्या चिमुकल्यांवर अत्याचार केले, त्याचे अंत्यसंस्कार इतर कुठेही करा, पण बदलापूरमध्ये आम्ही हे होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया सध्या बदलापूरमध्ये उमटत आहे.

नेमकं प्रकरण काय?

बदलापुरात शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैगिंक अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अक्षय शिंदे हा सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात होता. यानंतर तपासासाठी ठाण्यातील पोलीस अधिकारी ट्रान्सफर वॉरंट घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यासाठी तळोजा मध्यवर्ती कारागृहात गेले होते.

काल संध्याकाळी 5.30 च्या सुमारास आरोपी अक्षय शिंदेला पोलीस पथकाने तळोजा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला ठाणे येथे घेऊन जात असताना संध्याकाळी 6.00 ते 6.15 दरम्यान पोलीस वाहन मुंब्रा बायपास येथे आले. यावेळी आरोपी अक्षय शिंदे याने पथकातील पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्या कमरेचे सर्व्हिस पिस्तुल खेचून घेतले. यानंतर पोलीस पथकाच्या दिशेने 03 राऊंड फायर केले. त्यापैकी 1 राऊंड निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला. त्यानंतर त्याने 2 राऊंड इतरत्र फायर केले.

यानंतर स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने 01 गोळी फायर केली. ही गोळी आरोपी अक्षय शिंदेंला लागली आणि तो जखमी झाला. यानंतर पोलीस पथकाने तात्काळ अक्षय शिंदेला उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी आरोपी अक्षय शिंदेला मृत घोषित केले.

'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?
'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?.
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?.
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल.
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं.
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक...
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक....
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान.
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?.
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं.
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग.