Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाचं काम नेमकं कुठवर आलंय?

मुंबई ते नागपूरपर्यंतचा 710 किलोमीटर लांबीचा, सहा पदरी हा समृद्धी महामार्ग आहे.

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाचं काम नेमकं कुठवर आलंय?
Follow us
| Updated on: Dec 05, 2020 | 1:05 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज अमरावती आणि औरंगाबादचा दौरा करत आहेत. उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray ) हा दौरा महत्त्वाचा आहे. कारण या दौऱ्यात ते बहुचर्चित बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway) कामाची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री मुंबईतून नागपूर विमानतळावर जातील, तिथून ते अमरावती आणि मग औरंगाबादला जातील. मुख्यमंत्री आपल्या या दौऱ्यात दोन्ही जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेणार आहेत. (All about to know Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg)

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मार्गाला ठाकरे सरकारने आधीच स्वर्गीय बाळासाहेबांचं नाव दिलं आहे. यावरुनही मोठं राजकारण रंगलं. “ठाकरे सरकार हे स्थगिती सरकार आहे. या महामार्गाला केवळ बाळासाहेबांचं नाव दिल्यानेच महामार्गाचं काम सुरु आहे, अन्यथा सर्व कामांना या सरकारने स्थगिती दिली आहे”, असा आरोप भाजपने नेहमीच केला आहे.

समृद्धी महामार्ग

राज्यात मोठा गाजावाजा झालेला मुंबई ते नागपूरपर्यंतचा 710 किलोमीटर लांबीचा, सहा पदरी हा समृद्धी महामार्ग आहे. एकूण 10 जिल्हे, 27 तालुके आणि 392 गावातून हा महामार्ग जाणार आहे. सुरुवातीला म्हणजे चारवर्षापूर्वी साधारण 40 हजार कोटींचा हा प्रकल्प होता. आता त्याची किंमत 56 हजारा कोटींच्या पुढे गेली आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात म्हणजेच 7 सप्टेंबर 2016 रोजी या महामार्गाची अधिसूचना काढण्यात आली. नागपूर ते मुंबईपर्यंतचा हा समृद्धी महामार्ग भारतातील पहिला आणि जगातील तिसरा सर्वात मोठा महामार्ग आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातल्या नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा,जालना औरंगाबाद,अहमदनगर,नाशिक ठाणे या दहा जिल्ह्यातून जाणार आहे.

एकूण 710 किलोमीटर लांबीचा असलेला हा रस्ता तयार झाल्या नंतर नागपूर मुंबई हे अंतर फक्त 6 तासात कापणे शक्य होणार आहे. या महामार्गावरुन वाहने ताशी दीडशे किमी वेगाने धावू शकतात.

कसा आहे समृद्धी महामार्ग?

  • नागपूर ते मुंबई 710 किमी पर्यंतचा महामार्ग
  • एकूण 120 मीटर रुंदीचा हा रस्ता 6 पदरी असणार
  • एकूण 10 जिल्हे, 27 तालुके आणि 392 गावातून महामार्ग जाणार
  • नागपूर मुंबई हे अंतर फक्त 6 तासात कापणे शक्य
  • वाहने ताशी दीडशे किमी वेगाने धावू शकणार
  • शंभर फुटांवर डिव्हायडर
  • इमर्जन्सी विमानाचं लँडिंग करण्याचीही सुविधा

गडकरींची संकल्पना, ठाकरेंचा महत्वाकांक्षी प्रकल्प

नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाची मूळ संकल्पना केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची असल्याचं सांगितलं जातं. या मार्गाबाबत 1995 पासून चर्चा सुरू होती. फडणवीसांच्या काळात या महामार्गाची अधिसूचना निघाली आणि आता ठाकरे सरकारच्या काळातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरत आहे.

नागार्जुन कन्स्ट्रक्शन

नागपूर-मुंबई या 710 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. ही कंपनी या महामार्गाचं कामकाज करत आहे. मात्र मुख्य कंत्राटदार नागार्जुन कंपनीने 5 विविध कंपन्यांना कामे दिली आहेत. या कंत्राटदारांनी कामाला सुरुवात देखील केली.

हजारो एकर शेतजमिनीचं संपादन

तब्बल 710 किमी लांबीच्या या महामार्गासाठी जमीन संपादनही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांची ताब्बल 9 हजार हेक्टर जमीन ही प्रत्यक्ष रस्त्यासाठी तर 11 हजार हेक्टर जमीन ही स्मार्टसिटीजसाठी ताब्यात घेतली जात आहे.

नावावरुन वादंग

 नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाच्या नावावरुन मोठा वादंग रंगला होता. अखेर  (Balasaheb Thackeray samruddhi mahamarg) शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय ठाकरे मंत्रिमंडळाने डिसेंबर 2019 मध्ये घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात झालेल्या राज्य  मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याची घोषणा केली होती.

देशातील पहिल्या वहिल्या मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गाची मुहूर्तमेढही बाळासाहेब ठाकरेंनी रोवली होती. त्यांच्या योगदानाचा आणि दूरदृष्टीचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली होती.

तीन वर्षांचं टार्गेट

‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी (Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg) तीन वर्षांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 120 मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या 10 जिल्ह्यांमधील 27 तालुक्यांच्या 392 गावांमधून जाणार आहे.

Uddhav Thackeray

1 मेपर्यंत प्रवास करणार

येत्या 1 मेपर्यंत समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डी प्रवास करणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज 5 डिसेंबर 2020 रोजी अमरावतीत केली. जेव्हा समृद्धी महामार्ग पूर्ण होईल, तेव्हा सर्वोत्तम महामार्ग असेल, त्याचा निश्चित महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असंसुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. या महामार्गाचं काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे, चांगल्या दर्जाचं काम होत आहे. कोरोना काळातही समृद्धी महामार्गाचं काम सुरु होतं.

येत्या 1 मे 2021 पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरु होण्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तर 1 मे 2022 पर्यंत मुंबईपर्यंत महामार्ग सुरु होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

(All about to know Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg)

संबंधित बातम्या 

बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, सी लिंक, फडणवीसांच्या प्रकल्पांना ठाकरेंचा ब्रेक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.