शाळेत असताना चहा, भजी विकली, आता क्लास वन ऑफिसर, बारामतीच्या अल्ताफ शेखचे घवघवीत यश !
बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील अल्ताफ शेख यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेत असताना भजी व चहा विक्रीचे काम केलेले अल्ताफ यांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. पवार कुटुंबीयांचं गाव असलेल्या काटेवाडी येथील अल्ताफ यांनी सनदी अधिकारी बनण्याचा मान मिळवलाय.
पुणे : घरची परिस्थिती बेताची असतानाही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर बारामतीच्या युवकाने थेट क्लास वन ऑफिसर होण्याचे स्वप्न खरे करून दाखवले आहे. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील अल्ताफ शेख यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेत असताना भजी व चहा विक्रीचे काम केलेले अल्ताफ यांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. पवार कुटुंबीयांचं गाव असलेल्या काटेवाडी येथील अल्ताफ यांनी सनदी अधिकारी बनण्याचा मान मिळवलाय. (altaf shaikh from baramati pune passed upsc exam become class one officer)
राष्ट्रवादी करिअर अकॅडमीतील अल्ताफ यांचे घवघवीत यश
उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परिक्षांना सामोरे जाण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने बारामतीत राष्ट्रवादी करिअर अकॅडमी सुरु करण्यात आली. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी पोषक वातावरण उपलब्ध करुन देण्याचा या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला होता. या अकॅडमीतून शिक्षण घेतलेले अल्ताफ शेख आज क्लास वन अधिकारी बनले बनले आहेत. ही बातमी आल्यानंतर काटेवाडी व राष्ट्रवादी करिअर अकॅडमीत आनंद व्यक्त केला जातोय.
अल्ताफ यांचे नवोदय विद्यालयात शिक्षण
अल्ताफ शेख यांच्या जिद्दीची कहाणी युवकांसाठी प्रेरणादायी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देत ते या अगोदर असिस्टंट कमांडट बनले होते. इस्लामपूर येथे नवोदय विद्यालयात शिक्षण घेतलेले आलताफ त्यांनी जिद्दीने फूड टेक्नॉलॉजीतून बी. टेक.ची पदवी प्राप्त केली. 2013 पासून ते बारामतीत वास्तव्यास आहेत. त्यांनी 2015 ला यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून केंद्रीय सुरक्षा दलात कार्यरत आहेत. सुरुवातीला उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची बदली सध्या उस्मानाबाद येथे झाली आहे. सध्या इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून उस्मानाबाद येथे ते कार्यरत आहेत.
अल्ताफ यांच्या यशाचे सर्व स्तरातून कौतूक
ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परिक्षांना मदत करण्याच्या उद्देशाने सुनेत्रा पवार यांच्या पुढाकारातून 2012 मध्ये राष्ट्रवादी करिअर अकॅडमीची स्थापना केली गेली. आजपर्यंत 47 राजपत्रित अधिकारी या अकादमीतून तयार झाले असून असंख्य युवक युवती सरकारी नोकरीत स्थिरावले आहेत. अल्ताफ यांच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे.
खुल्या प्रवर्गातून 263 उमेदवार उत्तीर्ण
नागरी लोकसेवा आयोग 2020 च्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गातून 263 तर आर्थिक मागास प्रवर्गातून 86, अन्य मागास प्रवर्गातून 229 तर अनुसूचित जाती 122, अनुसूचित जमाती 61 उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
इतर बातम्या :
चंद्रपूरच्या आदित्य जीवनेची युपीएससीत उज्वल कामगिरी, परिक्षेत 399 वे रँक मिळवले
Monalisa : पारंपारिक अवतारात मोनालिसाने लावलं चाहत्यांना वेड, चाहते म्हणाले – ‘तुम्ही नेहमी इतक्या सुंदर कशा दिसता?’https://t.co/GkPB4GHQS7#Monalisa #Style #Fashion
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 25, 2021
(altaf shaikh from baramati pune passed upsc exam become class one officer)