नड्डा हे नेतृत्व नाही, मोदी आणि शाह यांनी बसवलेला रबरी स्टॅम्प, ठाकरे गटाच्या दानवे यांनी थेट नड्डा यांच्यावर साधला निशाणा
जे पी नड्डा म्हणजे मोदी आणि शाह यांनी बसवलेला रबरी शिक्का त्यामुळे त्यांच्या सभेला कोण येणार ? असा टोला अंबादास दानवे यांनी औरंगाबाद मध्ये लगावला आहे.
दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद : नुकतीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची औरंगाबाद येथे जाहीर सभा पार पडली आहे. त्या सभेतील रिकाम्या खुर्च्या असलेले व्हिडिओ विधानपरिषदेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत टीका केली होती. जे पी नड्डा यांनी जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. ठाकरे गटाचे आमदार तथा विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका करत असतांना जे पी नड्डा यांची खिल्ली उडवत भागवत कराड यांनाही टोला लगावला आहे. इतकंच काय तर कोरोनाच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा दानवे यांनी साधला आहे. यावेळी अंबादास दानवे म्हणाले, जे पी नड्डा यांच्या सभेला लोक आलेलेच नव्हते, निघून गेले असे नाही. खुर्च्या रिकाम्या होत्या. जे पी नड्डा यांना कोणीही ओळखत नाही, कोणीही सांगेल मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे, मी भारताचा अध्यक्ष आहे पण इथे नड्डाणा कोणीही ओळखत नाही.
जे पी नड्डा म्हणजे मोदी आणि शाह यांनी बसवलेला रबरी शिक्का त्यामुळे त्यांच्या सभेला कोण येणार ? असा टोला अंबादास दानवे यांनी औरंगाबाद मध्ये लगावला आहे.
पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे हे पावरफुल असतील पण भागवत कराड हे काही जनेतेतले नेते नाहीत, ते एक चांगले डॉक्टर आहेत, नेते होऊ शकत नाही म्हणत दानवे यांनी टोला लगावला आहे.
उध्दव ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्राचा विनाश झाला तर कोरोना काळात मोदींमुळे झाला असं आम्ही म्हणायचं का ? असा उलट सवाल करत चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
याशिवाय अंबादास दानवे यांनी राहुल शेवाळे यांच्यावर देखील हल्लाबोल करत काही सवाल उपस्थित केले आहे. त्यावरून चौकशीची मागणी केली आहे.
राहुल शेवाळे यांचे दाऊदशी संबंध होते हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहेत, राहील शेवाळे त्या भगिणीसोबत संबंध होते राहुल शेवाळे दुबईला जात होते,
तिथे आणखी कोण कोण खासदार दुबईला जात होते हे समोर आलं पाहिजे, तिथे त्यांच्यासोबत कोण कोण राहत होते हे पण कळलं पाहिजे असे सवाल दानवे यांनी उपस्थित केले आहे.