मोदींनी मुख्यमंत्री शिंदेंच्या पाठीवर मारलेल्या थापेवर विरोधीपक्ष नेते दानवे यांनी मारली कोपरखळी, म्हणाले…
अब्दुल सत्तार यांनी नाशिकमध्ये ठाकरे यांच्या सोबत राहिलो तर माजी आमदार नावापुढे लागेल अशी टीका केली होती त्याला दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाताला ओढून पाठीवर दिलेल्या शाबासकीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी नुकतीच टीका केली होती. संजय राऊत यांनी म्हंटलं होतं शाब्बास… बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडल्याबद्दल. ही टीका ताजी असतांना शिंदे गटाचे मंत्री त्यावर पलटवार करत असतांना पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही कोपरखळी मारली आहे. पाठीवर पडलेली थाप कधी निघेल हा अनुभव एकनाथ शिंदे यांना लवकरच येईल असा टोला लगावला आहे. नाशिकमध्ये मध्यमांशी बोलत असतांना अंबादास दानवे यांनी ही टीका केली आहे. पाठीवर हात फिरवणारे आणि फिरवून घेणाऱ्यांना जनता धडा शिकवेल अशी टोलेबाजी देखील दानवे यांनी केली आहे.
शॉर्टकट राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा हे मोदी खरं बोलले, महाराष्टात गद्दारी करून सत्ता आणणे हे शॉर्टकट राजकारचा भाग, या सर्व प्रवृत्तीला जनतेनं धडा शिकवला पाहिजे हे वक्तव्य योग्य असा टोलाही दानवे यांनी लगावला आहे.
पाठीवर पडलेली थाप कधी निघेल हा अनुभव एकनाथ शिंदे यांना लवकरच येईल, पाठीवर हात फिरवणारे आणि फिरवून घेणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असंही अंबादास दानवे यांनी म्हंटलं आहे.
याशिवाय अनिल देशमुख यांच्या जामीनाच्या निर्णयावर देखील अंबादास दानवे यांनी भाष्य करत भाजपवर टीका केली आहे. जाणीवपूर्वक यंत्रणांना घरच्या नोकरसारखं वापर केला जात असल्याचे म्हंटले आहे.
इतकंच काय तर अब्दुल सत्तार यांनी नाशिकमध्ये ठाकरे यांच्या सोबत राहिलो तर माजी आमदार नावापुढे लागेल अशी टीका केली होती त्याला दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दानवे म्हणाले, सत्तार यांच्या घरापुढे माजी आमदार म्हणूनच पाटील लागेल, त्यांनी चिंता करू नये
याशिवाय शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र तसे होणार नाही. निवडणूक आयोगाने काही निर्णय घाईने घेतले पण आधी सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावा असेही मत दानवे यांनी व्यक्त केले आहे.