बावनकुळेंच्या टीकेला दानवेंचं चोख प्रत्युत्तर, मेहबुबा मुफ्ती ते राम मंदिर, संगळंच काढलं

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. या टीकेला आता अंबादास दानवे यांच्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

बावनकुळेंच्या टीकेला दानवेंचं चोख प्रत्युत्तर, मेहबुबा मुफ्ती ते राम मंदिर, संगळंच काढलं
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 6:39 PM

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंगादेशमधील हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांचं हिंदू प्रेम बेगडी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान या टीकेला आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी बावनकुळे आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले दानवे?

अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर करण्यात आलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतला असून, बावनकुळे यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत जाणं हे यांचं कट्टर हिंदू प्रेम आहे का? राम मंदिर गळत आहे, हे यांचं कट्टर हिंदू प्रेम आहे का? चंद्रबाबू जे बोलतात ते यांचं कट्टर हिंदू प्रेम आहे का? नितीश कुमार बोलतात ते यांचं कट्टर हिंदू प्रेम आहे का असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  राजकारणासाठी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे हिंदुत्व वापरत नाहीत, हिंदुत्वाच्या प्रचारामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. शिवसैनिकांवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अनेक केसेसे आहेत. हे तर शेपूट घालून पळून जाणारे आहेत, त्यामुळे यांना शिवसेना बेगडी आहे की खरी आहे, हे शिकवण्याची गरज नसल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान येत्या रविवारी 15 डिसेंबरा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. नवे मंत्री नागपुरात शपथ घेणार आहेत. यावर देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या कामाच्या दिरंगाईमुळे मंत्र्यांचा शपथविधी नागपूरला होतोय, परंतु त्या ठिकाणी शपथविधी होणे वावगे नाही, शेवटी ती राज्याची राजधानी आहे. त्यामुळे एखादा शपथविधी तिथे झाला तर काहीही हरकत नाही, असं दानवे यांनी म्हटलं आहे. आता बावनकुळे दानवे यांच्या या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.