Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैशांअभावी बाळाचं ऑपरेशन रखडलं, पाय कापावा लागणार होता पण…

मनीषा रोकडे या अंबरनाथच्या सिद्धार्थनगर झोपडपट्टीत राहतात. मनिषानं 15 डिसेंबरला एका गोड मुलाला जन्म दिला.

पैशांअभावी बाळाचं ऑपरेशन रखडलं, पाय कापावा लागणार होता पण...
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 9:49 AM

अंबरनाथ: आपल्यासाठी कधी कोण देव बनून येईल, याचा काहीच नेम नसतो. अंबरनाथमध्ये एका माऊलीसाठी एक पत्रकार देवाच्या रूपानं धावून आला, आणि या माऊलीच्या अवघ्या दोन महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव वाचला. त्यामुळं आज मी जरी जन्मदाती असले, तरी बाळाला दुसरा जन्म देणारा पत्रकार ही त्याची दुसरी आई असल्याचं ही आई सांगते. (Ambarnath journalist Pankaj patil save child’s life help for surgery)

मनीषा रोकडे या अंबरनाथच्या सिद्धार्थनगर झोपडपट्टीत राहतात. मनिषानं 15 डिसेंबरला एका गोड मुलाला जन्म दिला. यानंतर सारंकाही आनंदात सुरु असताना 12 दिवसांनी या चिमुकल्याच्या उजव्या पायावर डास चावल्यासारखी गाठ आली. त्यामुळे घरच्यांनी त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल केलं. तिथे उपचार करून आल्यानंतरही पाय काही बरा झाला नाही. अखेरीस एका डॉक्टरांनी बाळाच्या पायाला इन्फेक्शन झाल्याचं सांगत उजवा पाय गुडघ्यापासून पाय कापावा लागेल असं सांगितलं. त्यामुळं बाळ झाल्याच्या आनंदात असतानाच या माऊलीवर मोठा मानसिक आघात झाला.

शहरातल्या डॉक्टरांनी यासाठी मुंबईच्या वाडिया रुग्णालयात जाण्याचा सल्ला त्यांना दिला. मात्र हातावर पोट असलेल्या मनीषा आणि तिचा पती शंकर यांना खर्चाच्या विवंचनेनं काय करावं हेच सुचेना झालं होतं. त्यातच बाळाच्या पायाचं ऑपरेशन लवकर झालं नाही, तर या इन्फेक्शनमुळे रक्तात संसर्ग होऊन बाळाच्या जीवावर बेतण्याचीही भीती होती. अशावेळी अंबरनाथमधील पत्रकार पंकज पाटील यांना ही गोष्ट समजली आणि ते या चिमुकल्याचा खरे देवदूत बनले.

आई म्हणते आता बाळाचं नाव तुम्ही ठेवा

पंकज पाटील यांना ही बाब समजताच त्यांनी या बाळाच्या ऑपरेशनची पूर्ण जबाबदारी घेतली. यानंतर शहरातल्या एक दोन डॉक्टरांसह वाडिया आणि केईएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांचाही सल्ला घेतला. मात्र, सगळीकडून बाळाचा पाय कापावा लागेल, हेच उत्तर मिळत होतं. त्यामुळं पंकज पाटील यांनी या बाळाला पुन्हा घरी आणलं. मात्र त्याच्या जीवावर बेतण्याची भीती लक्षात घेऊन नाईलाजास्तव या चिमुकल्याला पुन्हा एकदा वाडिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन केलं आणि सुदैवानं त्याचा पूर्ण पाय न कापता पायाची बोटं कापण्यावरच निभावलं.

यानंतर काही दिवसांनी तिथेच या बाळाच्या पायावर प्लास्टिक सर्जरी सुद्धा करण्यात आली आणि आता नुकतंच हे बाळ घरी आलंय. आधी वेदनेनं विव्हळणाऱ्या बाळाच्या चेहऱ्यावर आता असलेलं हसू पाहून त्याची आई मनीषा भावूक होते. मऊ जरी या बाळाला जन्म दिला असला, तरी बाळाला दुसरा जन्म देणारे पंकज दादा हे त्याची दुसरी आई असल्याचं मनीषा सांगते. त्यामुळेच या बाळाचं नाव ठेवण्याचाही हक्क तिने पंकज पाटील यांनाच दिला आणि पंकज पाटील यांनी शिवांश असं या बाळाचं नामकरण केलं.

(Ambarnath journalist Pankaj patil save child’s life help for surgery)

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.