मी माझा ‘मालक’ आहे, मी कुणाचा ‘गुलाम’ नाही…प्रकाश आंबेडकर यांनी कुणाला सुनावलं? आंबेडकर यांचा रोख कुणाकडे?
शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर भाष्य करत भाजपसोबत कोणत्या अटीवर जाण्यासाठी तयार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटलं आहे.
योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : मी माझा मालक आहे, मी कुणाचा गुलाम नाही, मला भाजपसोबत जायचं असेल तर मला कोण थांबवणार आहे, राज्यातील कोणत्या नेत्यामध्ये हिम्मत आहे, मी सेनेसोबत युती केली इतरांचे मला काही देणंघेणं नाही, सेनेसोबतची युती कशी पुढे जाणार हे तुम्हाला दिसणार आहे असं स्पष्टचं प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचा किंवा प्रकाश आंबेडकर यांचा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे जागावाटपाचा प्रश्नच येत नाही असंही शरद पवार म्हणाले होते त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे. याशिवाय भाजपसोबत जाण्याची अटही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टचं बोलून दाखवली आहे. भाजप आणि मोहन भागवत यांनी मनुस्मृतीचे दहन केली तर आम्ही भाजपसोबत जाऊ असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटलं आहे.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकिसंदर्भात सेनेची आणि महाविकास आघाडीने अद्याप भूमिका जाहीर केली नाहीये, त्यांच्या भूमिकेनंतर आमची भूमिका जाहीर करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे.
भाजपला आणि आरएसएसला लाईटली घेऊ नका. आता जो सर्व्हे खूप घाईत आला आहे, ईडी आणि सीबीआयचा वापर करून राज्या-राज्यामधील सत्ता टिकवण्याचा भाजपचा प्रयन्त असणार आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला आहे.
कर्नाटकचा निकाल हा देशामधील आगामी ट्रेण्ड असणार आहे, मोदी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय त्यामुळे कर्नाटकची निवडणूक बघावी लागेल असेही आंबेडकर यांनी म्हंटलं आहे.
युती जाहीर झाल्यानंतर भाजपने ट्रॉलिंग सुरू केले त्यावरून त्यांना किती मानसिक आणि मतांचा त्रास झाला आहे हे दिसतंय असा टोलाही भाजपला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडी जाहीर झाली त्याचं एवढं गांभीर्याने घेतलं नाही, तेवढं आमची युती जाहीर झाल्यावर परिणाम झाला आहे, याचा भाजपवर राजकीय परिणाम होणार आहे.
भाजप आणि मोहन भागवत यांनी मनुस्मृतीचे दहन केली तर आम्ही भाजपसोबत जाऊ असं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरचं करून टाकलं आहे.