नागपूरच्या दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगला विरोध, आंबेडकरी अनुयायांचे आंदोलन
नागपूर येथील दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्कींग योजनेला आंबेडकरी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. या भूमिगत पार्कींग योजनेमुळे स्तूपाला धोका निर्माण होऊ शकतो असे आंबेडकरी अनुयायांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागपूरच्या दीक्षाभूमीवर आंदोलकांनी विरोध करण्यासाठी तोडफोड केली आहे.
नागपूर येथील दीक्षाभूमी येथील भूमिगत पार्कींग आंबेडकरी संघटनांनी जोरदार विरोध करीत आंदोलन सुरु केले आहे. या भूमिगत पार्कींग योजनेमुळे स्तूपाला धोका निर्माण होऊ शकतो असे संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांना नागपूरच्या दीक्षाभूमीवरील बांधकामाला विरोध करीत जाळपोळ सुरु केली आहे. आणि भूमिगत पार्किंगचे बांधकाम सुरु असलेल्या जागेवर हल्लाबोल करीत जोरदार आंदोलन सुरु केले आहे.
सर्व पक्षीयांचा विरोध आहे – सुषमा अंधारे
डॉ. बाबासाहेब यांची प्रेरणाभूमी आहे. ही जागा जगभरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगभरातील अनुयायासाठी प्रेरणास्थान आहे. जमिनीच्या वर बीम का उभे केले जात आहेत.हे कळण्यापलिकडे नाही. त्यामुळे येथील भूमिगत पार्किंगला विरोध सुरु झाला आहे. स्मारक समितीची भूमिका समजू शकलेली नाही असे शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांचाही विरोध
या भूमिगत पार्कींगला विरोध होत आहे. अंडरग्राऊंड तीन मजली पार्किंगचे कामाला आधीपासूनच विरोध आहे. कारण येथील लोकांनी पार्किंगची मागणी केलेली नाही. त्यामुळे या दीक्षाभूमीला धक्का बसेल असे कोणतेही बांधकाम केलेले नाही. त्यामुळे या आंदोलकांना आमचा पाठिंबा असल्याचे वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
दीक्षाभूमीचे महत्व काय
14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. दीक्षाभूमीत भूमिगत पार्कींगमुळे स्तूपाला धोका असल्याचे आंबेडकर अनुयायींचे मत आहे. स्मारक समितीच्या या सर्व विकास योजनांमुळे नागपूरच्या दीक्षाभूमीच्या अस्तित्वाला धोका असल्याचे आंबेडकरी अनुयायांचे म्हणणे आहे. ‘धम्मचक्र प्रवर्तन दिनी’ येथे जगभरातील अनुयायी येत असतात. येथील स्तूपात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिंचे जतन देखील करण्यात आलेले आहे. त्यामुळे जगभरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्माला मानणाऱ्या जनतेच्या भावना यासंदर्भात तीव्र आहेत.