कोल्हापूरः उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निशाणा साधात काँग्रेसवर पुन्हा एका 12 हजार कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे. ज्या काँग्रेसने 12 हजार कोटीचं घोटाळा करणाऱ्या काँग्रेस आणि त्यांचे सहकारी शरद पवार यांच्यासह आमच्यावर अजूनही 9 वर्षात एकाही घोटाळ्याचा आरोप आमच्यावर करू शकले नाहीत असा टोला अमित शाह यांनी लगावला आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूरात येऊन ठाकरे गटासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरही जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या घोटाळ्यातील सहकारी शरद पवारही होते.
मात्र आमची नऊ वर्षे सत्ता येऊनही आमच्या पक्षावर अजून एकही घोटाळ्याचा आरोप झाला नाही. मात्र महाराष्ट्रात आमच्या जीवावर सत्ता स्थापन केली. तरीही आमचे तत्व सोडून आम्ही कोणताही राजकीय निर्णय घेतला नाही असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.
महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी 2019 मध्ये निवडणुका लागल्या होत्या. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या की नाही असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना विचारला.
In the land of Rajarshi Shahu Ji Maharaj, Kolhapur, addressing ‘Vijay Sankalp Rally’ organised by Maharashtra BJP .
राजर्षी शाहूजी महाराजांची भूमी असलेल्या कोल्हापुरात @BJP4Maharashtra च्या ‘विजय संकल्प रॅली’ला संबोधित करणार आहे.
https://t.co/mx5txsYWOx— Amit Shah (@AmitShah) February 19, 2023
त्यावेळी मोदींचा आणि लहान आकारातील उद्धव ठाकरेंचा फोटो होता की नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. आमच्या नेत्यांचे फोटो वापरून सत्ता तुम्ही मिळवली तरीही आम्हाला त्या सत्तेचा लोभ नव्हता असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.
ज्या भाजपच्या जीवावर महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली, त्याच सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तुम्ही तळवे चाटले असा घणाघात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. हिंदुत्व सोडून तु्म्ही तत्व बाजूला केला.
तरीही आम्ही सत्तेसाठी विचारांची बळी दिला नाही अशा शब्दात त्यांनी ठाकरे गटावर जहरी टीका केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळेच एकनाथ शिंदे गटाची शिवसेना आता असली बनून धनुष्यबाणासह भाजपसोबत आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
तर महाराष्ट्र हित हे आमच्यासाठी सर्वोपरी. त्यामुळे यावेळी महाराष्ट्रातून लोकसभा आणि विधान सभेमध्ये संपूर्ण विजय पाहिजे असे आवाहन भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी बोलताना राजकीय नेत्यांना राज्यातील सर्वच्या सर्वच 38 जागा आल्या पाहिजेत असंही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपच्या युतीने महाराष्ट्रावर वर्चस्व निर्माण करणं गरजेचं आहे असून ज्यांनी धोका दिला आहे त्यांना धडा शिकवणंही गरजेचं असल्याचा इशााराही त्यांनी यावेळी दिला.