Amit Shah : आपणच घड्याळ आणि धनुष्यबाणाला हरवलं तर… अमित शाह यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना काय सांगितलं?

राज्यात विधानसभा निवडणुका कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे वारंवार महाराष्ट्रात येऊन राज्यातील जनतेशी संवाद साधले आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह हे काल कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी भाजप आणि मित्र पक्षांचं सरकार आणण्यासाठी कामाला लागा, असे आदेशच पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Amit Shah : आपणच घड्याळ आणि धनुष्यबाणाला हरवलं तर... अमित शाह यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना काय सांगितलं?
अमित शाह यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना काय सांगितलं?
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 11:52 AM

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. तसेच विधानसभा निवडणुका कशा जिंकायच्या याचा कानमंत्रही दिला. निवडणुकीत जोमाने काम करा. आपली सत्ता कशी येईल याचा विचार करा. आपणच घड्याळ आणि धनुष्यबाणाला हरवलं तर सत्ता कशी येईल? असा सवाल अमित शाह यांनी केला. अमित शाह यांनी राज्यात सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करण्याच्या सूचनाही कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अमित शाह यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सूचना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षित यश न मिळाल्याने कार्यकर्ते थोडे उदास झाले. पण आता आळस झटका. हारजीत होत असते. आता मजबुतीने काम करा. आता विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांचं सरकार आणायचा संकल्प करा. आपणच घड्याळ आणि धनुष्यबाणाला हरवलं तर जिंकणार कोण? असा सवाल अमित शाह यांनी केला.

ठाकरे-पवारांच्या कार्यकर्त्यांना गळाला लावा

महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण बहुमत आणायचं असेल तर विरोधकांची मुळंच कमकुवत करा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बुथ लेव्हलच्या कार्यकर्त्यांना भाजपशी जोडा, असे आदेशही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. त्याला आपल्याशी जोडून त्याच्या कौशल्याचा उपयोग करून घ्या, असं अमित शाह म्हणाले.

तुमचं स्थान कमी होणार नाही

तुम्हाला वाटत असेल बाहेरच्या लोकांना घेतलं तर आपलं स्थान कमी होईल. पण असं होणार नाही. गेली 10 ते 15 वर्ष भाजपशी जोडलेल्या कार्यकर्त्यांना भाजपनं काही दिलं नाही. पण म्हणून पक्ष तुमचं योगदान विसरलाय असं होत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

वक्फ बोर्ड कायदा आणणारच

यावेळी अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली. काँग्रेस आणि मित्र पक्षांचे मिळून जेवढे खासदार आहेत, तेवढे एकट्या भाजपचे खासदार आहेत हे राहुल गांधी यांनी समजून घ्यावं. राहुल बाबांनी हे लक्षात ठेवावं की तुमचं हे आयुष्यातील सर्वात मोठं यश आहे. यापुढे भाजप अशी संधी कधीही देणार नाही. राहुल गांधी यांनी कितीही विरोध केला तरी वक्फ बोर्डचा कायदा आणणार म्हणजे आणणारच, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.