बाबा आणि साहेब… राज ठाकरे यांच्यासोबतचं नातं कसं?; अमित ठाकरे यांनी उलगडले नात्यातील पदर
अमित ठाकरे हा राजकारणातील नवा, आश्वासक चेहरा आहे. राजकीय मंचावर ते मनसेचे कार्यकर्ते म्हणून दिसतात, तर राज ठाकरे हे मनसे प्रमुख म्हणून... पण अमित आणि राज ठाकरे यांचं नात कसं आहे, याबद्दल त्यांनीच एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दिलखुलासपणे सांगितलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या वक्तृत्वशैलीमुळे, शानदार भाषणांमुळे आणि रोखठोक भूमिकेमुळे ओळखले जातात. सध्या मनसे आणि भाजपच्या बैठकांची चर्चा असून मनसे लवकरच महायुतीत जाणार अशाही चर्चा सुरू होत्या. राज ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्या या दिल्लीवारी दरम्यान सोबत अमित ठाकरे हे त्यांचे पुत्रही होते. अमित ठाकरे हा राजकारणातील नवा, आश्वासक चेहरा आहे. . राजकीय मंचावर ते मनसेचे कार्यकर्ते म्हणून दिसतात, तर राज ठाकरे हे मनसे प्रमुख म्हणून… बाहेर, कार्यकर्त्यांसमोर त्यांच नातं दिसतं ते वेगळं, पण घरात ते त्यांचे वडील आहेत. अमित आणि राज ठाकरे यांचं नात कसं आहे, याबद्दल त्यांनीच एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दिलखुलासपणे सांगितलं.
राज ठाकरेसोबतचं नातं कसं ?; अमित ठाकरे यांनी उलगडले नात्यातील पदर
राज ठाकरे तुमचे बाबा आहेत, पण ते साहेब पण आहेत, तुमचं नातं कसं आहे ? असा सवाल अमित ठाकरे यांना विचारण्यात आला. ‘ घरी वडिलांचं नातं पण बाहेर साहेबांचं.. घरी असतात तेव्हा ते सगळ्या वडिलांसाखेच असतात. आपल्या घरी आपले बाबा कसे वागतात, तसेच तेही असतात. तू काय करतोयस ? जेवायला काय मागवू ? वर ये, माझ्याबरोबर पिक्चर बघ, असा सर्वसामान्य घरात असतो, तसांच आमचा बाप-लेकाचा संवाद असतो’ असं अमित ठाकरे म्हणाले.
मी जेव्हा राजकारणात आलो, तेव्हा त्यांना अहो म्हणायचं की तू, हा माझ्यापुढचा प्रश्न होता. त्यांना ‘साहेब’ म्हणणं हे माझ्यासाठी कठीण होता. त्यांना , बाबांना असं पण मी फार कष्टाने म्हणतो. मला त्यांना अरे, तुरे म्हणायची सवय. माझे बाबा बाळासाहेबांना पण अरे तुरे करायचे. बायका पण अहो जाओ करतात पण ते नकोय मला, असंही अमित ठाकरे म्हणाले.
राज साहेबांचा मुलगा नसतो तर…
ज्या क्षेत्रातला माणूस असेल तर त्याला विचारतो आपण काय सल्ला द्याल तर तुम्ही तरुणांना काय सल्ला द्याल ? असा सवालही अमित ठाकरे यांना विचारण्यात आला. बातम्या बघू नका, असं थेट उत्तर त्यांनी दिलं. मी राज साहेबांचा मुलगा नसतो, तर राजकारणात आलो नसतो. मी काहीही केलं असतं. माझ्या वडिलांनी जो प्लॅटफॉर्म दिलाय, तो घेऊन पुढे चाललोय. डोकं खाली ठेवा आणि लोकांसाठी काम करा. सध्याच्या राजकारण्यांमध्ये मला लॉयल्टी आणि पेशन्स दिसत नाहीत. मला हे नवीन येणाऱ्या पिढी मध्ये बघायचं आहे. कारण पन्नास ओव्हरचे पिक्चर 20 ओव्हरचे झाले, पण निवडणुकीसाठी पाच वर्षाची वाट पाहावी लागते. राजकारणात पेशन्स ठेवणं महत्वाचं आहे. इन्स्टंट रिजल्ट मिळेल, असं होऊ शकत नाही. एका हिरोचा पिक्चर फ्लॉप झाला, तर पुढल्या शुक्रवारी येऊ शकतो. पण एक नेता निवडणूक हरला तर पुढच्या पाच वर्षांनी येणार. त्याच्यामुळे पेशन्स महत्वाचा आहे. नंतर लॉयल्टी महत्वाची आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.