मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक यादीतून खासदार अमोल कोल्हे गायब

अमोल कोल्हे यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक यादीतून गायब झालंय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक यादीतून खासदार अमोल कोल्हे गायब
Image Credit source: TV9marathi
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 7:28 PM

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराजी नाट्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे नाराज असल्याची बातमी समोर आली होती. या बातमीवर कोल्हेंनीदेखील नाराज नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. पण त्यांच्या नाराजीच्या वृत्ताला खतपाणी घालणारी आणखी एक बातमी समोर आलीय. अमोल कोल्हे यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक यादीतून गायब झालंय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्टार प्रचारक यादी जाहीर करण्यात आलीय.पण या स्टार प्रचारकांच्या यादीतून अमोल कोल्हे यांचं नाव गायब झालंय. त्यामुळे कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचं काही दिवसांपूर्वी शिर्डीत चिंतन शिबिर पार पडलं होतं. या शिबिरात पक्षाध्यक्ष शरद पवार हे आजारी असून हाताला बँडेज बांधून पोहोचले होते. पण या कार्यक्रमाला अमोल कोल्हे उपस्थित नव्हते. त्यामुळे अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज असल्याची बातमी समोर आली होती.

दुसरीकडे अमोल कोल्हेंनी प्रकृती बरी नसल्याने आपण कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नव्हतो. याबाबत आपण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सांगितलं होतं, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली होती.

अमोल कोल्हेंची अमित शाहा यांना भेट

अमोल कोल्हे यांनी नुकतंच काही दिवसांपूर्वी ‘शिवप्रताप गरुड झेप’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनासाठी भेट घेतल्याचं स्वत: स्पष्ट केलं होतं.

अमोल कोल्हेंची देवेंद्र फडणवीस यांना भेट

याशिवाय अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प, चाकण येथे होणारा इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प या संदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.